logo

अक्कलकुवा येथील जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

अक्कलकुवा प्रतिनिधी: गंगाराम वसावे ( दि.5) आज
जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
अक्कलकुवा येथील जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी. एड. च्या छात्र अध्यापकांडून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक दिनानिमित्त प्राचार्य पदाची धुरा सुनील पराडके या विदयार्थी-शिक्षकाने सांभाळली. वसावे करणसिंग , उम्मे हबीबा, राऊत अश्विन, वसावे पंकज, वसावे रविंद्र,पावरा अरुणा, पावरा पुष्पा, या विद्यार्थ्यां- शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांना अध्यपनादरम्यान आलेल्या अनुभवांचे कथन केले.

प्रा. आशिष वसावे यांनी सर्व छात्र अध्यापकांना शुभेच्छा दिल्या व प्रा. सरिता पाडवी यांनी शिक्षक कसा असावा व तो समाजासाठी काय करू शकतो याबद्दल माहिती दिली. प्रा. तौसिफ अन्सारी यांनी शिक्षक व शिक्षकी व्यवसाय या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य साजिद पिंजारी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन परिचय करून देत त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षक समाज घडवतो समाजासाठी शिक्षकाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. म्हणून आपण सर्वांनी उत्कृष्ट शिक्षक व्हावे व समाज घडविण्यात आपले योगदान द्यावे असा गुरुमंत्र दिला.
कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

78
6132 views