*अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या प्रयत्नातून अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना अनुदान मिळणार*..........
देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे यांनी सांस्कृतिक मंत्री मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब तसेच सांस्कृतिक विभाग यांचेकडे गेल्या आठ महिन्यांपासून *करोना महामारीमुळे* नुकसान झालेल्या मराठी चित्रपट निर्माता यांचे *अनुदान अपात्र* चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून *सरसकट अनुदान* देण्याची मागणी केली होती त्याला बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष) यांनी सहकार्य केले आणि दि. 4 सप्टेंबर 24 रोजी मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब आणि संपूर्ण सांस्कृतिक विभाग अधिकारी यांची बैठक मंत्रालय येथे झाली.
त्यामध्ये मा. मंत्री महोदय यांनी *अनुदान अपात्र* मराठी चित्रपटांना अनुदान देण्याची विनंती स्विकारली आहे. तरी *अनुदान अपात्र मराठी चित्रपट निर्माता यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ* यांचेकडे संपर्क साधून आपल्या चित्रपट बाबत माहिती द्यावी.
याप्रसंगी मराठी अनुदान योजनेत बदलही करण्यासाठी मा. मंत्री महोदय यांनी सुचना दिल्या असून *जास्तीत जास्त मराठी चित्रपटांना अनुदान मिळेल* असा नवीन शासन निर्णय घेण्याचे संबंधित अधिकारी यांना सुचविले आहे.
*अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ* यांच्या प्रयत्नास यश मिळत आहे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते यांचेकडून अभिनंदन होत आहे.
या निर्णयानंतर *निर्माता महामंडळ* मराठी चित्रपट वितरणातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून कोणत्याही मराठी चित्रपटांना थिएटरचा प्रॉब्लेम राहणारच नाही असे देवेंद्र मोरे/ बाळासाहेब गोरे यांनी सांस्कृतिक मंत्री यांना प्रस्ताव दिला आहे.