logo

भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जी यांच्या हस्ते सातपुड्याचा ढाण्या वाघ विधानपरिषद मधील एकमेव आदिवासी सदस्य मा. ना. श्री. आमश्या दादा पाडवी साहेब यांचा सन्मान

अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे)
आज दि. ०३/०९/२०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने विधानभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सण २०२३-२४ करिता ' उत्कृष्ट भाषण ' या सदरात भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जी यांच्या हस्ते सातपुड्याचा ढाण्या वाघ विधानपरिषद मधील एकमेव आदिवासी सदस्य मा. ना. श्री. आमश्या दादा पाडवी साहेब यांचा सन्मान करण्यात आला..
या प्रसंगी राज्यपाल महामहीम श्री. सी. पी. राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार, मा. ना. श्री. देवेंद्र जी फडणवीस, विधानपरिषद सभापती आदरणीय श्रीमती नीलम ताई गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर जी, उपाध्यक्ष मा. श्री. नरहरी झिरवाळ साहेब, संसदीय कार्य मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांत जी पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते श्री. अंबादास दानवे व विधिमंडळातील आजी माजी सहकारी उपस्थित होते.

62
2757 views