logo

पत्रकारांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहिम बदलापूर पोलिसांनी सुरू केली आहे.......

बदलापूरहून आलेली बातमी धक्कादायक,
निषेध करावी अशीच आहे..
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर बदलापूर मध्ये जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला.. लोक रस्त्यावर उतरले .. या जनआंदोलनाची बातमी कव्हर करणे पत्रकारांचे काम होतं...
ते त्यांनी केलं..
आता वार्तांकन करणारया पत्रकारांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहिम बदलापूर पोलिसांनी सुरू केली आहे..
श्रध्दा ठोंबरे या महिला पत्रकारावर लोकांना भडकवलयाचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.. रेल्वे पोलिसांनी देखील पत्रकारांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे..
"चालणं कुठं"
नावाचा वाक्प्रचार प्रचलीत आहे..
म्हणजे बडयां धेंडांना हात लावायची हिंमत नाही, म्हणून दुबळयांना ठोकायचे असा या म्हणीचा अर्थ..
बदलापूर पोलिसांचं वर्तन असंच आहे..
वामन म्हात्रे यांचा अटकपूर्वजामीन अर्ज कल्याण न्यायालयाने दोनदा, मुंबई उच्च न्यायालयाने एकदा फेटाळूनही वामन म्हात्रे यांना पोलीस हात लावत नाहीत, ज्या शाळेत मुलीवर अत्याचार झाले त्या शाळेच्या व्यवस्थापनाला पोलीस पाठिशी घालत आहेत..
मात्र वार्तांकनाचं आपलं काम करणारया पत्रकारांवर गुन्हे दाखल करून त्याच्या अटकेची तजवीज केली जात आहे..
पोलिसांची ही मर्दुमकी आहे?
बदलापुरातील पोलिसांची ही मुजोरी संतापजनक आणि निषेधार्थ आहे..
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषद पोलिसांच्या मनमानीचा निषेध करीत आहे..

157
15758 views