देगलुर सराफा व्यापाऱ्यांचा बंद; तेलंगाना पोलिसाची सराफ्यात दहशत
तेलंगानातील पोलीस काही आरोपींना घेऊन सराफामध्ये फिरून चोरीचा माल घेतला आहे असा आरोप देगलूर सराफा व्यापाऱ्यांवर केला आहे ' त्यामुळे सराफा व्यापाऱ्यात दहशत निर्माण झाली . सराफा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद करून देगलूर पोलीस प्रशासनास निवेदन दिले. तेलंगाना पोलीसांनी आरोपीना बाजपेठ तुन फिरवत, मिरवत सराफा व्यापारांवर दादागिरी केल्या मुळे व्यापारी घाबरले परंतु तेलंगाना पोलिस देगलूर पोलिस प्रशासनाला कल्पता देऊन चौकशी करायला पाहिजे होते तसे झाले नसल्यामुळे प्रचंड गोधळ निर्माण झाला देगलूर पोलीस प्रशासन यांनी सराफा व्यापारांनी कोणीही चोरीचा माल विक्री स आल्यास आम्हाला कळवावे असे आवाहन केले आहे.