logo

हेअर ड्रेसरला धमकी देऊन अत्याचार लॉजच्या खोलीत डांबून बलात्कारी पसार; पोलिसांकडून शोध सुरू.............

हेअर ड्रेसरला धमकी देऊन अत्याचार लॉजच्या खोलीत डांबून बलात्कारी पसार; पोलिसांकडून शोध सुरू.............

कल्याण - मधील एका २१ वर्षीय हेअर ड्रेसर महिलेवर बाका प्रसंग गुदरला आहे. जुन्या मित्राने आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगून या हेअर ड्रेसरला कल्याण पूर्वेतील लॉजवर नेले. तेथे तिच्या मनाविरूध्द लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला त्याच लॉजमधील खोलीत डांबून पळून गेलेल्या तरूणाच्या विरोधात हेअर ड्रेसरने कोळसेवाडी पोलिसांजवळ कैफियत मांडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून बलात्काऱ्याचा शोध सुरू केला आहे. रणविजय माधव सिंग (३०, रा. कालीमाता मंदिराजवळ, उतेकर चौक, नूतन शाळेजवळ, कल्याण-पूर्व) असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित महिला कल्याणमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम
करते. कल्याण पूर्वेतील त्यासाठी आपल्याला पार्टीसाठी कोळसेवाडीतील श्री लॉजमध्ये मंगळवार ते बुधवार या दोन दिवसांच्या कालावधीत रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीमध्ये
जायचे असल्याचे खोटे सांगितले.
रणविजयच्या बोलण्यावर विश्वास
ठेऊन पीडिता त्याच्याबरोबर कल्याण
पूर्वेत गेली. आरोपी रणविजय याने
पीडितेला कोळसेवाडी परिसरातील श्री
लॉजमध्ये नेले. येथेच वाढदिवस
साजरा होणार असल्याचे पुन्हा त्याने
पीडितेला सांगितले.

हेअर ड्रेसर आणि आरोपी रणविजय सिंग हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी सकाळी आरोपी रणविजय सिंग याने पीडितेला आपल्या एका मित्राचा वाढदिवस आहे,
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीमध्ये
जायचे असल्याचे खोटे सांगितले.
रणविजयच्या बोलण्यावर विश्वास
ठेऊन पीडिता त्याच्याबरोबर कल्याण
पूर्वेत गेली. आरोपी रणविजय याने
पीडितेला कोळसेवाडी परिसरातील श्री
लॉजमध्ये नेले. येथेच वाढदिवस
साजरा होणार असल्याचे पुन्हा त्याने
पीडितेला सांगितले.

काही वेळाने रणविजय याने पीडितेला दमदाटी करून तु माझ्या जीवनात येणार नसशील तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही. तु माझ्याशी परत प्रेमसंबंध ठेव, असे बोलून पीडितेला बेदम मारहाण करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पीडितेवर तिच्या मनाविरुध्द जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लॉजच्या खोलीत डांबले आणि बाहेरून कुलूप लावून तेथून पसार झाला. लॉज चालकाला हा प्रकार कळल्यानंतर त्याने खोली उघडली. त्यावेळी पीडिता खोलीमध्ये असल्याचे आढळून आले. पीडितेने रणविजय विरुध्द कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

242
8688 views