logo

मुरबाड मधील पत्रकार संजय बोरगे यांना ग्रामीण शोध पत्रकारिता पुरस्कार प्रदान......!

मुरबाड मधील पत्रकार संजय बोरगे यांना ग्रामीण शोध पत्रकारिता पुरस्कार प्रदान..!

समृध्दी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता गौरव समेलन मोठ्या दिमाखात पार पडले. या शानदार सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मधील दुर्गम भागात गेल्या २५ वर्षा पासून शोध पत्रकारिता करीत असणारे पत्रकार संजय बोरगे यांना या वर्षीचा मानाचा ग्रामीण शोध पत्रकारिता गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

इंटरनॅशनल इन्व्यारलमेंट मल्टीपर्पज ह्युमन सर्विस ऑर्गानायझेशन इंडीया, समृध्दी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुबई यांच्या विद्यमाने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन २०२४ मोठ्या दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. स्वपखांच्या बळावर नवी क्षितीजे शोधणाऱ्या कर्तुत्वावान रत्नविरांचा सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष समाजसेवक दिनेश उघडे, उद्घाटक प्रसिद्ध चित्रपट निर्माती नेहा धुरी, राष्ट्रीय सचिव रिपाई (आ) चे सुरेशदादा बारशिग होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्टार प्रवाह मधील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी,

आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट अभिनेते झाकिर खान होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष समृध्दी प्रकाशनचे संचालक प्रा. डॉ. बी.ए एन. खरात व सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड

होते. संमेलनाचे आयोजक व निमंत्रक समन्वयक संमेलन डोंबिवली आणि मुम्बईचे श्वेता शिर्के व विशाल देशमुख होते.

सोहळ्याचे अध्यक्षस्थान युवा नेते समाजसेवक दिनेश उघडे यांनी भूषवले. वा राष्ट्रीय संमेलनात मुरबाड मधील पत्रकार संजय बोरगे यांना यंदाचा मानाचा ग्रामीण शोध पत्रकारिता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानात प्रदान करण्यात आला. या पुरस्कारा बाबत मुरबाड मध्ये पत्रकार संजय बोरगे यांचा मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत, भाजप युवा नेते नरेश मोरे, आरपीआय आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष समाजसेवक दिनेश उघडे, पत्रकार दिलीप पवार यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करून पत्रकार संजय जय बोरगे बोरगे यांचे अभिनंदन करून कौतुक केले

33
4465 views