logo

आटपाडी येथे निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०४ जणांचा उत्फुर्त सहभाग.

आटपाडी येथे निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०४ जणांचा उत्फुर्त सहभाग.

संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन रजि.दिल्ली शाखा आटपाडी यांचे वतीने संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०४ जणांनी उत्फुर्त सहभाग घेतला.शिबिराचे उद्घाटन निरंकारी मंडळाचे सातारा झोनचे झोनल इन्चार्ज परम आदरणीय नंदकुमारजी झांबरे यांचे हस्ते तसेच खानापुर सेक्टर चे संयोजक आदरणीय दत्तात्रयजी जगताप यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी झांबरे जी म्हणाले की संत निरंकारी मंडळ ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे सारी सृष्टी एका प्रभु परमात्म्याची असुन सगळ्यांचा निर्माता परमेश्वर एक आहे मानवाची सेवा‌ हीच ईश्वराची सेवा या निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे शिकवणीनुसार रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, आपत्तीच्या वेळी मदत कार्य राबविणे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समिती आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी यावेळी भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक व प्रशंसा केली आज निरंकारी मंडळाच्या विचारधारेची समाजाला गरज आहे समाजामध्ये पाहिले असे विश्वबंधुत्वाचे विचार पहावयाला मीळत नाही समाजाने याचे अवलोकन करुन मंडळाची विचारधारा आत्मसात करावी तेव्हाच मानुष्य प्राणी सुखी होईल अदी भावना व्यक्त केल्या रक्तसंकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज डॉ शेंडे सर यांचे टिमने केले.
कार्यक्रमाचे नियोजन आटपाडी शाखेचे मुखी पांडुरंग नाईकनवरे सेवादल संचालक महेश बाबर यांचे मार्गदर्शन खाली ब्रँचमधील सेवादल संत महापुरुष माता भगिनी यांनी केले.

16
6691 views