logo

संत निरंकारी मिशन शाखा जत येथील रक्तदान शिबीरात १४५उत्फुर्त सहभाग

संत निरंकारी मिशन शाखा जत येथील रक्तदान शिबीरात १४५उत्फुर्त सहभाग

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे - आमदार विक्रमसिंह सावंत

(आमदारांनी प्रथम स्वत रक्तदान करून केले शिबिराचे उद्घाटन)

संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन रजिस्ट्रेशन दिल्ली शाखा जत यांचे वतीने साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे आयोजित रक्तदान शिबिरात १४५जणांनी उत्फुर्त सहभाग घेतला यामध्ये महिला वर्गाचेही प्रमाण मोठ्या संख्येने होते.
शिबीराचे उद्घाटन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे हस्ते करण्यात आले त्यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली यावेळी बोलताना ते म्हणाले की "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे" सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सर्वांनी रक्तदान केले पाहिजे निरंकारी मंडळाचे कार्य महान आहे तेथील भक्त निस्वार्थी भावनेने सेवा करतात ते भेदभाव मानत नाहीत त्यांची शिकवण घेण्यासारखी आहे.आज वातावरणातील बदलामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे ते जर कमी करायचे असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी वृक्षलागवड करून कमीत कमी त्याची तीन वर्षे संगोपन केले पाहिजे येणाऱ्या कालावधीत आपण सर्वांनी संकल्प करुया की येणाऱ्या जुन महिन्यात सर्वांनी झाडे लाऊन जोपासुया दरम्यानच्या कालावधीत त्यांनी निरंकारी प्रकाशन स्टालला भेट दिली त्यावेळी त्यांना मिशनचे साहित्य व सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचा फोटो भेट देण्यात आला त्यांनी या मिशनच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग रामपुर गावचे विद्यमान सरपंच मारुती पवार साई प्रकाश मंगल कार्यालयचे मालक श्रीकृष्ण पाटील उपस्थित होते.यावेळी विष्णु भिमराव शिंदे यांनी १२६ व्यांदा रक्तदान केले रक्तसंकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे डॉ शेंडे यांचे टिमने केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता साळे यांनी केले.
नियोजन जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे सेवादल संचालक संभाजी साळे यांचे मार्गदर्शन खाली तालुक्यातील सर्व सेवादल संत महापुरुष यांनी केले.

6
1118 views