logo

इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या कल्याणची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर यांची निवड........


ठाणे- डोंबीवली..
अतिशय उत्साही आणि थाटात साजऱ्या झालेल्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यशस्वी आयोजन करून आयएमए कल्याणने मैलाचा नवा दगड रचला आहे. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण दिवाणी वकील संघटनेचे ॲड. जयदीप हजारे, रोटरी क्लबचे विजय वैद्य यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

सामाजिक उपक्रमांमुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड आणि आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार सोहळा पार पडला. या प्रसंगी नव्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. सुरेखा ईटकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्षपदासह नव्या विश्वस्त, कार्यकारिणी समिती सदस्य, राज्य आणि केंद्रीय प्रतिनिधींचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली. 
कार्यामुळे, तसेच गेल्या काही वर्षांत शहरासाठी राबवलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे इंडीयन मेडीकल असोसिएशनने कल्याणकरांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. कल्याण शहराच्या भल्यासाठी आणि कल्याण शहराचे नाव देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठराविक संस्थांपैकी आयएमए कल्याण ही महत्वाची संस्था आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच अतिशय उत्साही आणि थाटात साजऱ्या झालेल्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यशस्वी आयोजन करून आयएमए कल्याणने मैलाचा नवा दगड रचला आहे. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण दिवाणी वकील संघटनेचे ॲड. जयदीप हजारे, रोटरी क्लबचे विजय वैद्य यांच्यासह विविध. वैद्यकीय संघटनांचे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

66
3928 views