logo

नांदेड लोकसभेसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.73 टक्‍के मतदान



नांदेड दि. 26 –16- नांदेड लोकसभेसाठी मतदान आज 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सुरु झाले आहे. नांदेड मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यत सरासरी 7.73 टक्‍के मतदान झाले आहे.

नांदेड ग्रामीण भागातही मतदान उत्‍साहात सुरु झाले असून अनेक बुथवर मतदारांच्‍या रांगा दिसून आल्‍या आहेत. नांदेड शहरी व ग्रामीणमध्‍ये वयोवृध्‍द तसेच नवमतदारासह सर्व गटातील मतदारामध्‍ये मतदान करण्‍याचा उत्‍साह दिसून येत आहे. नांदेड लोकसभा मतदार संघातील नांदेड दक्षिण मध्‍ये सकाळी 9 वाजेपर्यत सर्वाधिक 10.5 टक्‍के मतदान झाले असून सर्वात कमी मुखेड येथे 5.2 टक्‍के मतदान झाले आहे. भोकर 6.45 टक्‍के, नांदेड उत्‍तर 7.97 टक्‍के, नांदेड दक्षिण 10.5 टक्‍के तर नायगाव 9.17 टक्‍के आणि देगलूर 6.9 टक्‍के, मुखेड 5.2 टक्‍के मतदान झाले आहे.

0000

0
0 views