logo

चित्रपट "दडपण"लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! निर्माते नीलेश आहेर यांची माहिती.......


अहमदनगर कर्जत -
ग्रामीण भागावर भाष्य करणारा दडपण चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे, अशी माहिती चत्रपट दिग्दर्शक निर्माते नीलेश आहेर यांनी पत्रकारांना दिली.

या वेळी सहनिर्माती व अभिनेते नितीन आहेर उपस्थित होते. या वेळी नीलेश आहेर म्हणाले की, ग्रामीण भागावर भाष्य करणारा दडपण या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटात नगर जिल्ह्यातील खर्डा, जामखेड, नायगाव नया परिसरात चित्रीकरण करण्यात आले आहे. याशिवाय झगमग हे गाणेदेखील रिलीज करण्यात आले असून, ते प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीला उतरल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटात अभिनेता आणि
सहनिर्माता नितीन आहेर, तर
दडपण या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण खर्डा, जामखेड, नायगाव परिसरात करण्यात आले असून, लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.

सहनिर्माती ऋषाली भोसले असून, प्रमुख कलाकार नितीन आहेर, अभिनेत्री गौतमी कांबळे यांच्यासह अनेक नवीन कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटात काही स्थानिक
कलाकारांनाही संधी दिली आहे.

ग्रामीणसह शहरी भागातील प्रेक्षकांच्या हृदयास भिडणारी दडपण या चित्रपटाची कथा असून, हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी झळकणार आहे, असे नीलेश आहेर यांनी सांगितले.

128
11547 views