logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आविसं,राष्ट्रवादी पक्षाला धक्का.! खमनचेरू ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच नितीन कोडापे व मनिलाताई मडावी माजी सरपंच राष्ट्रवादी यांच्यासह अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला भाजपात प्रवेश..!! युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश.!

आविसं,राष्ट्रवादी पक्षाला धक्का.!


खमनचेरू ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच नितीन कोडापे व मनिलाताई मडावी माजी सरपंच राष्ट्रवादी यांच्यासह अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला भाजपात प्रवेश..!!

युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश.!

अहेरी :- प्रतीनिधी/दिलीप शेडमाके
दिवासी विद्यार्थी संघटनेचे ग्रामपंचायत खमनचेरु येथील विद्यमान उपसरपंच नितीन कोडापे,व राष्ट्रवादी पक्षाचे मनीलाताई मडावी माजी सरपंच खमनचेरु यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत अहेरी येथील रुक्मिणी महालात भाजप पक्षात अधिकृत प्रवेश केला.यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत केले.विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपात आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.माझ्यावर विश्वास करून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे.तुमचा विश्वासघात मी कदापी होऊ देणार नाही. तुमच्या क्षेत्रांतील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राजेंनी यावेळी केले!

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी ह्यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता असून त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातुन राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण आहे.

याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

144
3493 views

Comment