आळंदी ( रवि कदम ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास आषाढी देवशयनी एकादशी दिनी सुमारे लाखावर भाविकांनी श्रीचे दर्शनास भल्या पहाटे हरीनाम गजर करीत गर्दी केली. राज्य परिसरातून आलेल्या सुमारे लाखावर भाविकांनी श्रीचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. तत्पूर्वी माऊली मंदिरात पहाटे साडे चारचे सुमारास ११ ब्रम्हवृंदानी वेदमंत्र जयघोषात रुद्राभिषेक परंपरेने केला. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. इंद्रायणी आरती सेवा समितीचे वर्धापन दिना निमित्त इंद्रायणी आरती, इंद्रायणी पूजा, दीप पूजन, इंद्रायणी नदीत दीप सोडत उत्साहात इंद्रायणी आरतीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशी दिनी श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शन बारीत रांगा लावून भाविकांनी दर्शनास गर्दी करीत श्रीचे समाधी दर्शन घेतले. माऊली मंदिरात हरिपाठ कीर्तन सेवेस भाविक, नागरिकांचे उपस्थितीने उत्साही प्रतिसाद मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात होत असल्याचे संजय रणदिवे यांनी सांगितले. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांचे नियंत्रणात कर्मचारी, सेवक, पोलीस मित्र आदींनी भाविकांच्या दर्शनासाठी प्रभावी नियोजन केले. सुमारे लाखावर भाविकांनी आळंदी मंदिरात श्रीचे दर्शन घेतले. यावर्षी इंद्रायणी नदीला महापुराची पाणी असल्याने श्रींचे परंपरेने होणारी नगरप्रदक्षिणा यावेळी राम घाटमार्गे झाली. हजेरी मारुती मंदिर, नगरप्रदक्षिणा मार्गे यावेळी श्री लक्ष्मी नारायण विष्णू मंदिर, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ) राम घाट मार्गे श्रींचे पालखीची हरिनाम गजरात परंपरेने ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. देवशयनी एकादशी निमित्त माऊलींचे पालखीची नगर प्रदक्षिणा होती. इंद्रायणी नदीला पाणी असल्यामुळे श्रींची पालखी रामघाट मार्गे हरिनाम गजरात मार्गस्थ झाली. श्रींची पालखी राम घाट मार्गे आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ) आळंदी मंदिरा समोर आल्यावर श्रींचे पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्रींची आरती, पूजा आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी यांचे तर्फे विधिवत झाली. यावेळी विश्वस्त अर्जुन मेदनकर, विश्वस्त अविनाश गुळुंजकर, श्रींचे पुजारी, रोहिदास कदम, माऊली घुंडरे, गोविंद ठाकूर, सोमनाथ बेंडाले, उमेश बिडकर, अमर गायकवाड, प्रसाद बोराटे, सागर रानवडे, प्रतीक कुऱ्हाडे, योगीराज कुऱ्हाडे, संजय रणदिवे, सौरभ चौधरी, मंगेश आरु, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, पपू वरखडे, आळंदीकर ग्रामस्थ, पदाधिकारी, खांदेकरी, वारकरी, भाविक आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी पोलिस, मंदिरातील सुरक्षा रक्षक, सेवक-पोलिस हवालदार, पोलीस मित्र यांनी बंदोबस्त ठेवला. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी सेवकांनी परिश्रम घेतले. अनेक भाविकांनी वारकरी यांना फराळाचे वाटप केले. आळंदी संस्थांनच्या वतीने प्रभावी पिण्याचे पाण्याची व्यवस्था, प्रसाद वाटप करण्यात आले. आळंदीकर ग्रामस्थानी श्रींची पालखी माऊली माऊली जयघोष करत खांद्यावर घेत हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणेस विशेष परिश्रम घेतले. नगरप्रदक्षिणे दरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी परिश्रम घेतले. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आदींनी बंदोबस्त नियोजन केले. एकादशी निमित्त आलेल्या भाविक - वारकरी यांनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा हरीनाम गजरात केली. येथील मंदिर परिसरात थेट दुचाकी वाहने येत असल्याने भाविकांना मंदिर परिसरात ये-जा करताना काहीशी गैरसोय झाली.हरिपाठ कीर्तनसेवेस उत्साही प्रतिसाद संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली. माऊली मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत हरिपाठ कीर्तन सेवेस भाविकांनी गर्दी केली. श्रींचे पालखीचे आषाढीस पंढरपूरला जाण्यास प्रस्थान झाल्या नंतर ते श्रींची पालखी आळंदीत परत येई पर्यंत येथील वै. स्व. विष्णुबुवा चक्रांकित महाराज यांचे घराण्याकडे सेवेचा मान आहे. अवधूत महाराज चक्रांकित यांचे नियंत्रणात परंपरेने कीर्तन सेवेची परंपरा आहे. श्रींचे विना मंडपात हरिपाठावर आधारित माऊली मंदिरात कीर्तन सेवा परंपरेने सुरु आहे. एकादशी दिनी हजेरी मारुती मंदिरात देखील त्यांचे वतीने चक्रांकित महाराज यांचे शिष्य जगदीश महाराज जोशी त्र्यंबकेश्वर, अवधूत चक्रांकित महाराज यांची कीर्तनसेवा माऊली मंदिरात होत आहे. कीर्तन सेवेस हरीनाम गजरात सुरुवात झाल्यानंतर देखील हजेरी मारुती मंदिरात नगरप्रदक्षिणे दरम्यान श्रींचे वैभवी पालखीचे दर्शनास भाविकांची मोठी गर्दी झाली. दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्रींचे पालखी ग्रामप्रदक्षिणा करीत असताना दर्शन घेतले. श्रींचे पालखीचे मंदिरात नगरप्रदक्षणे नंतर आगमन झाले. यावेळी मानक-याना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला. आळंदी ग्रामस्थानी श्रींचे पालखीस खांदा देत श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी पूजन, आरती, दीपदान समर्पित तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती सेवा समिती, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची पूजा, आरती हरिनाम गजरात झाली. यावेळी पुष्प सजावट, पुष्परांगोळी काढण्यात आली. आषाढी वारी देवशयनी एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी इंद्रायणी आरती उपक्रमातील गुणवंत मान्यवर यांना कोषागार, रुख्मिणी कदम, पुणे कोषागार अधिकारी मनीषा जाधव, खंडाळा नगरपरिषद विरोधी पक्षघटनेते नगरसेवक संदीप जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका मालनताई घुंडरे, माजी नगरसेविका उषा नरके, संयोजक अर्जुन मेदनकर, संयोजिका अध्यक्षा राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान अध्यक्षा अनिताताई झुजम, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, शोभा कुलकर्णी, सरस्वती भागवत, अनिता शिंदे, शालन होणावले, शैला तापकीर, सरस्वती घुंडरे, सुरेखा कुऱ्हाडे, लता वर्तुळे, शिला कुलकर्णी, रोहिदास कदम, माऊली घुंडरे, राजेश नागरे, वेल्फेअर पोलीस मित्र अध्यक्ष योगेश जाधव, वैभव दहिफळे आदी मान्यवर उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करून स्वच्छता ठेवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने संयोजक अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पसायदानाने उपक्रमाची सांगता झाली. .