logo

*राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी इर्शाद पटेल..* देगलूर .. राज्यभर एकजूट असलेल्या राष्ट्र

*राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी इर्शाद पटेल..*
देगलूर .. राज्यभर एकजूट असलेल्या राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नव्याने इर्शाद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध वर्तमान पत्रात लिखाण करणारे वार्ताहर, सोशल मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता करणारे बातमीदार, प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार, उच्च दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर तालुक्यांत राष्ट्रीय पत्रकार संघ भारत ही संघटना अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. विविध वर्तमान पत्राचे संपादक, प्रतिनिधी या संघटनेला जोडत आहेत. यासाठी काही दिवसापूर्वी कार्यकारणी जाहीर झाली होती. नुकताच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या उपस्थितीत कार्यकारणीत फेर बदल होऊन प्रा. इर्शाद पटेल यांची नव्याने संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य कार्यकारिणी सदस्य पदी पवन महाराज वैष्णव यांची निवड करण्यात आली. सोबतच सदस्यपदी कार्यरत असलेले अमोल शिंदे यांची तालुका संपर्क प्रमुख पदी, मारोती कुडकेवार जिल्हा संपर्क प्रमुख पदी, पिराजी इबितवार शहापूरकर यांची तालुका सदस्यपदी, तसेच धम्मानंद सोनाळकर यांची तालुका सदस्यपदी एकमताने निवड करून सत्कार करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप भालेराव राष्ट्रीय पत्रकार संघ भारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी भूषविले. राज्य कार्यकारिणी सदस्य पवन महाराज वैष्णव, संघटनेचे देगलूर तालुका अध्यक्ष योगेश जी. जाकरे, जिल्हा सहसचिव अनिल पवार, जिल्हा संपर्क प्रमुख मारोती कुडकेवार, जिल्हा संघटक प्रकाश गवलवाड, लक्ष्मण पवार, सुभाष वाघमारे, शेखर पंतुलवार, अमोल शिंदे यासह आदी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जाकरे यांनी केले तर प्रास्ताविक शशिकांत पटणे यांनी मांडले, आभार सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. नव नियुक्त सर्व पदाधिऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आले.

26
2980 views
  
1 shares