logo

देगलूर बसस्थानकामध्ये पोलीस चौकी उभारण्यासाठी हालचाली सुरू शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या कार्याला यश बसस्थानकातील

देगलूर बसस्थानकामध्ये पोलीस चौकी उभारण्यासाठी हालचाली सुरू शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या कार्याला यश
बसस्थानकातील पाण्याची टाकी पाडुन त्याठिकाणी लवकरच पोलिस चौकी उभारू असे आश्वासन आगार प्रमुखांनी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांना ग्वाही दिली होती
नागरिकांतून होत आहे धनाजी जोशी यांच्या कार्याचा गौरव
मागिल महिन्यात देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी शिष्टमंडळा सहित आगार प्रमुख अमर पाटील साहेब यांना बसस्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या सोडुन जुन्या व नव्या बसस्थानकामध्ये पोलिस चौकी उभारावे यासाठी निवेदनाद्वारे मागणी करुन अमरण उपोषणाचा इशारा दिला होता तसेच उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम साहेब व नायब तहसीलदार नेटके साहेब यांना हि परिस्थिती वाचुन दाखवली होती उपजिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालून संबंधित विभागास योग्य ती कारवाई साठी पाचारण केले होते त्यामुळे बसस्थानकातील संबंधित अधिकारी यांनी मोडकळीस आलेल्या पाण्याची टाकी पाडली असुन लवकरच त्याठिकाणी पोलिस चौकी उभारू असे देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांन कळविले होते या कामाचे सुरवात झाले असून आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून मोडकळीस आलेल्या पाण्याची टाकी पाडुन जमिनदोस्त करण्यात आली आज त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल आगार प्रमुख अमर पाटील यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या
या कार्याबद्दल समस्त देगलूरकरांन कडुन देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांना केलेल्या कामाबद्दल गौरव केला जात आहे...

58
9793 views
  
1 shares