logo

देगलूर येथील प्रसिद्ध डॉ . जे. आय . भूमे 33 वर्षापासून वैदयकिय क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यांच्या मुलाला (डॉ. राहुल भुम

देगलूर येथील प्रसिद्ध डॉ . जे. आय . भूमे 33 वर्षापासून वैदयकिय क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यांच्या मुलाला (डॉ. राहुल भुमे ) यांना भेटण्यासाठी इंग्लंडला गेले होते .येथून परत येताना त्यांच्या अनुभवातून आपण डॉक्टर असल्याचा स्वाभिमान त्यांना वाटला . हा किस्सा त्यांनी शेअर केला. . . .
"डॉक्टर असल्याचा अभिमान"
इंग्लंडमध्ये काम करत असलेल्या माझा मुलगा डॉक्टर राहुल भूमे यास भेटून दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहा वाजता लंडन ते हैदराबाद दिल्ली मार्गे एअर इंडियाच्या विमानात बसलो, साधारण दहा तासाचा प्रवास असल्यामुळे सर्वजण जेवण करून डुलक्या घेऊ लागले
साधारण आठ तासाचा प्रवास झाल्यानंतर भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान विमानामध्ये अनाउन्समेंट ऐकून मी जागा झालो
" कोणी डॉक्टर आहेत का? एका प्रवाशाला चक्कर येत आहे व त्यांना मदत पाहिजे आहे" असा मतितार्थ त्या अनाउन्समेंट चा होता
मी खडबडून जागा होऊन लगेच त्या सहप्रवाशापाशी पोहोचलो व त्यांची तपासणी केली असता नाडी मंद लागत होती, सहप्रवासी गुंगीत दिसत होता
आठ तासाचा प्रवास करून एकसारखे बसून व अर्धवट झोपेमुळे बहुतेक त्यांना चक्कर आली असावी असा माझा ओपिनियन झाले व मी त्यांना लगेच खाली जमिनीवर आडवे पडण्याचा सल्ला दिला व सर्व हवाई सुंदरी सह त्यांना जमिनीवर आडवे झोपवले

थोड्या वेळानंतर त्यांना जमिनीवरून मागील मोकळ्या खुर्चीवर झोपवण्याचा प्रयत्न मध्ये पुन्हा एकदा त्या प्रवाशाला चक्कर आली व कपड्यांमध्ये लघवी झाली त्यांना उचलून रिकाम्या तीन खुर्च्यावर झोपवल्यानंतर थोड्या वेळात त्यांना शुद्ध आली, त्यांना थोडेसे साखरेचे पाणी पाजले
पुढील दोन तास मी त्यांना वारंवार तपासणी करून धीर दिला व दिल्लीला उतरल्यानंतर दवाखान्यात दाखवण्याचा सल्ला दिला
त्या प्रवाशाच्या वैद्यकीय इतिहास मध्ये कसलाच आजार नव्हता, वय साधारण 65 वर्षाचे व रात्रभराच्या बसून प्रवासामुळे बहुदा चक्कर आली असावी
या मित्रासोबत नंतर बोलणे झाले व त्यात त्यांना तपासणीमध्ये कसला आजार आहे का याची खातरजमा होत आहे असे समजले
डॉक्टर म्हणून आज पर्यंत गेल्या 33 वर्षापासून मी देगलूरला वैद्यकीय व्यवसाय करत आहे, खूप अनुभव आले, काही चांगले, काही वाईट
लंडन ते हैदराबाद मार्ग दिल्ली विमानातील या अनुभवातून डॉक्टर असल्याचा अभिमान वाटला .
डॉ. जे. आय. भूमे देगलूर

180
16444 views