logo

जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यामध्ये आपले योगदान द्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज महाराष्ट्राच्या ५६व्

जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यामध्ये आपले योगदान द्या
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.


आमच्या जीवनाचा हाच उद्देश असावा, की आम्ही जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकू. आम्ही स्वत:ला अशा प्रकारे घडवावे, की आपण सर्व एकतेच्या मार्गावर अग्रेसर आहोत. आपण एकमेकामध्ये कोणताही भेदभाव बाळगू नये, सर्वांना समान दृष्टीने पहावे. कोणी काय आहार घेतात, कसे दिसतात, त्यांची वेशभूषा कशी आहे, त्यांची जात वेगळी आहे या सर्व भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेचा व्यवहार करावा.
जोपर्यंत आपण सर्वांना समान दृष्टीने पाहणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनात वास्तविक भक्तीचा उद्गम होऊ शकणार नाही. भले मग आमची आस्था, विश्वास कोणावरही असो. जोपर्यंत आपण आपल्या गुरु-पीर-पैगंबरांची आणि संतांची वचने पूर्णपणे आपल्या जीवनात, वाणीमध्ये, व्यवहारामध्ये आणि आचरणात आणत नाही, तोपर्यंत आपल्या निजस्वरुपाला प्राप्त करु शकणार नाही. कारण आपल्या सर्वांचे मूळ हेच आहे, की- ‘इक्को नूर है सब दे अन्दर नर है चाहे नारी है।’ अर्थात् ‘सर्वांभूती असे एक ज्योती पुरुष असो किंवा नारी’.
तात्पर्य, हे परमात्मा रूपी अस्तित्व एकच आहे जे सर्वांभूती सामावलेले आहे. परमात्म्याने एवढ्या मोठ्या विश्वाची निर्मिती केली आणि त्यामध्ये या पृथ्वीची रचना केली. या धरतीवर भिन्न-भिन्न प्रांतांमध्ये मनुष्याची उत्पत्ती केली. निश्चितच आणि स्वाभाविकत:च वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलेल्या या मानव प्राण्याच्या आस्था आणि श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. सर्वांचे आपापले धर्म आहेत आणि त्यानुसार वाहेगुरु, अल्ला, गॉड, ईश्वर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते परमात्म्याचे स्तुतिगायन करत आहेत. परंतु या सर्वाचे मूळ शोधून पाहिले तर हीच वास्तविकता समोर येते, की समस्त मानवमात्र या एकाच निराकार परमात्म्याची लेकरं आहेत. आमचा प्रारंभ आणि अंत या प्रभुमध्येच आहे. असे असूनही आपण स्वत:ला जर एखाद्या विशिष्ट नामाशी किंवा रूपाशी जोडत असलो तरीही ते मुबारक आहे. तथापि, आपण हे लक्षात घ्यायला हवे, की आम्ही कुठेही असलो किंवा आमची आस्था कुठेही असली तरी सर्वप्रथम आपण एक मनुष्य आहोत. एक मनुष्य या नात्याने आपण आपल्या जीवनात मानवी गुण धारण करायला हवेत.
संत निरंकारी मिशनचीदेखील हीच धारणा आहे, की- ‘धर्म जोडतो, तोडत नाहीं’. आपण जरी कोणत्याही धर्माला मानणारे असलो तरी आपली भावना ही मानवाला मानवाशी जोडण्याची असायला हवी. जीवनात आपण एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हायला हवे, एकमेकांना साथ द्यायला हवी, एकमेकाला सुख-आराम द्यायला हवा. प्रत्येक सज्जनाच्या हृदयामध्ये हीच धारणा असायला हवी. कोणत्याही कारणाने आपण एकमेकांमध्ये दुरावा येऊ देऊ नये. तो महात्मा कोणत्यातरी वेगळ्या धर्मावर आपली आस्था ठेवत आहे आणि माझी श्रद्धा कोणत्यातरी वेगळ्या धर्मावर असेल तर ते एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे कारण बनू नये. जीवनामध्ये आपले सर्वांचे एकच लक्ष्य असायला हवे आणि ते म्हणजे एकोप्याची भावना अंगीकारणे.
धर्म व आध्यात्मिकता यांचे कार्य सुरवातीपासूनच जोडण्याचे राहिलेले आहे. ते एक असे साधन आहे ज्याद्वारे सर्वप्रथम आपण यथार्थ मनुष्य बनू शकतो. सुरवातीपासूनच जसे संतांनी सांगितले आहे आणि गुरु-पीर-पैगंबरांनी आदेश दिले आहेत, प्रत्येक धर्माची सदोदित हीच शिकवण राहिली आहे, की आपण प्रत्येकाच्या प्रति सद्भावना बाळगावी. सर्वांसाठी आपल्या मनामध्ये दया, करुणा बाळगावी, सहनशीलता धारण करावी, आपले हृदय विशाल करावे, ईर्षा, द्वेष, तिरस्कार यांसारख्या भावनांचा त्याग करावा. तेव्हाच आपण जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकतो.
.....

34
16621 views
  
1 shares