logo

सांगली कुपवाड महानगर पालिका हद्दीतील चिन्मय पार्क ते संजयनगर रस्त्यास सदगुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे नाव आध्या

सांगली,मिरज कुपवाड शहर महानगर पालिका हद्दीतील चिन्मय पार्क ते संजयनगर रस्त्यास सदगुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे नाव

आध्यात्मिक जागृती द्वारे मानवामध्ये असलेल्या मानवी गुणाची ओळख करून देऊन जगामध्ये विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे महान कार्य करणारे निरंकारी मिशनचे तत्कालीन सदगुरु निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांचे नाव सांगली मिरज कुपवाड महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील चिन्मय पार्क ते संजय नगर रस्त्यास देण्यात आले आहे. पूज्य मोहन छाब्राजी मेंबर इंन्चार्ज संत निरंकारी मंडळ दिल्ली व सांगलीचे महापौर माननीय श्री दिग्विजय सुर्यवंशी यांचे शुभहस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी महापौर सुर्यवंशी साहेब म्हणाले, की संत निरंकारी मंडळाच्या कार्याने मी प्रभावित झालो आहे. तसे तर माझ्या महापौर पदाच्या कार्य काळात अनेक सामाजिक कार्ये झाली आहेत; पण सदर रस्त्याचे नामकरण करण्याचे कार्य माझ्या हस्ते झाले हे मी माझे परमभाग्य समजतो
यावेळी निरंकारी पूज्य मोहनजी छाब्रा जी म्हणाले की संत महापुरुषांनी सदैव मानव कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे विषयी बोलायचे झाले तर सूर्याला दिवा दाखवल्यासारखे होईल. सदगुरु बाबाजीनी मानवास मानव प्रिय असावा एकमेकाचा आधार बनावा अशी शिकवण समस्त विश्वाला दिली निरंकारी मिशन एक मानवतेचे मिशन आहे निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृती बरोबरच स्वच्छता अभियान,वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तसंकलन करणे इत्यादी सामाजिक कार्याद्वारे मानव सेवा हीच ईश्वराची सेवा या बाबाजीच्या शिकवणीनुसार कार्य करीत आहे. आज वर्तमान समयाच्या सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज हे कार्य अविरतपणे करित आहेत सदर रस्त्यास निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी महानगर पालिकेचे आभार मानले.यावेळी नगरसेविका कांचन कांबळे, समाजसेवक संजय कांबळे, श्री.नंदकुमार झांबरे, झोनल इन्चार्ज सातारा, श्री.अमरलाल निरंकारी झोनल इंचार्ज कोल्हापुर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक व सेवादल अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.
------------------------------------

71
14714 views
  
1 shares