logo

ज्ञान विकास स्पोर्ट्स फाउंडेशन ला ठाणे अजिंक्यपद खो खो किशोर- किशोरी गटात विजेतेपद , ठाणे - १४ वर्षांखालील किशोर-

ज्ञान विकास स्पोर्ट्स फाउंडेशन ला ठाणे अजिंक्यपद खो खो किशोर- किशोरी गटात विजेतेपद ,

ठाणे - १४ वर्षांखालील किशोर- किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा या दिनांक २९/०९/२०२२ ते ०१/१०/२०२२ या दरम्यान राजर्षी शाहू महाराज विद्यालय रबाळे येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये ज्ञान विकास स्पोर्ट्स फाउंडेशन या मुला - मुलींच्या दोन्ही संघांनी प्रथम विजेतेपद पटकावले .तसेच या स्पर्धेमधून ठाणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणारा मुला- मुलींचा संघ निवडला गेला. मुलींच्या संघामध्ये धनश्री कंक, प्राची वांगडे, श्रुती भोसले, सिद्धी मराठे, स्वरा साळुंखे अशा पाच मुलींची ठाणे जिल्हा संघात निवड झाली आहे.धनश्री कंक ही राष्ट्रीय खेळाडू हिची ठाणे जिल्हा संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.तसेच मुलांच्या संघांमध्ये तन्मय घोरपडे, साहिल शिंदे ,विनायक भणगे, सार्थक वांगडे,सार्थक सपकाळ अशा पाच खेळाडूंची ठाणे जिल्हा संघात निवड झाली आहे.३७ वी किशोर- किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा कालावधी १६/१०/२०२२ ते १९/१०/२०२२ रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचा किशोर आणि किशोरी गटाचा संघ येथे प्रतिनिधित्व करणार आहे.
ज्ञानविकास विद्यालयाचे प्रशिक्षक श्री विनायक मनसुख , लोकेश निकाळे, ज्ञानविकास स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष-श्री प्रसाद परशुराम पाटील, सचिव-चंद्रकांत मोरेश्वर पाटील, खजिनदार-विद्यानंद दिनानाथ पाटील, तसेच क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

109
14684 views