logo

लातूर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनची कार्यकारीणी बैठक संपन्न. प्रतिनिधी : विकास कुलकर्णी.संपर्क. ९६५७६७०७६५. ( लातूर.

लातूर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनची कार्यकारीणी बैठक संपन्न.
प्रतिनिधी : विकास कुलकर्णी.संपर्क. ९६५७६७०७६५. ( लातूर.) जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन ची नुकतीच बैठक संपन्न झाली.यावेळी या बैठकीत
असोसिएशनचे अध्यक्ष श्री.विष्णूजी भुतडा यांची दिल्ली येथे झालेल्या नॅशनल योगासन स्पोर्ट फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीत सर्वानुमते त्यांची फेडरेशनच्या फायनान्स डायरेक्टरपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय कार्यकारीणीचे आभार व्यक्त करण्यात आले ,
तर मा.श्री. विष्णूजी भुतडा यांचे जिल्हा असोसिएशनच्यावतिने भव्य सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. साहेबराव जाधव,
सचिव अ‍ॅड. महादेव प्रकाश झुंजे,
सह सचिव श्री.प्रा.डॉ. मनोज रेड्डी, श्री. रामलिंग बिडवे, श्री. अमर वाघमारे, सौ. आशा संजय भुसनुरे(झुंजे), श्री.ज्ञानेश्वर पाटील आदीच्या उपस्थितीत सदर बैठक संपन्न होवून नोव्हेंबर मध्ये होणा-या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरीता जिल्हा संघाचा आढावा घेण्यात आला.
तसेच जिल्हा स्तरावर सभासद नोंदणी करून जिल्ह्यात तालूका योगासन स्पोर्ट असोसिएशन करीता संलग्नता करून घेण्याचेही यावेळी ठरले.

0
14665 views