logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....


मराठवाडा शिक्षक मतदार संघ भाजपाची मतदार नोंदणी अनुषंगाने बैठक संपन्न

येत्या काळात होऊ घातलेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मतदाराची नोंदणी अनुषंगाने भाजपाची बैठक या मतदारसंघाचे नोंदणी प्रभारी मनोज पांगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाली. यावेळी ॲड.व्यंकटराव गुंड, सुधिर पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, ॲड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, पांडुरंग लाटे, प्रभाकर मुळे, अभय इंगळे, साहेबराव घुगे, शिवाजी गिड्डे, पांडुरंग अण्णा पवार, विनोद राठोड, दिगंबर बंडगर, दत्ता पेठे, सुजित साळुंके, अमोल राजेनिंबाळकर, मकरंद पाटील, रोहित निंबाळकर, रोहित देशमुख, यांच्यासह शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.

यावेळी बोलताना मराठवाडा विभागाची नोंदणी प्रमुख मनोज पांगरकर म्हणाले की कन्नड पासून किनवट पर्यंत आठ जिल्ह्याचा हा मतदारसंघ असून या मतदारसंघातील विजयासाठी नोंदणी अत्यंत महत्त्वाची असल्याने भाजपाच्या संयोजकांनी शिक्षक आघाडीच्या समन्वयातून अधिकाधिक नोंदणी करावी असे आवाहन करून अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या बैठकीस शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मंडलाध्यक्ष नोंदणी संयोजक सहसंयोजक उपस्थित होते.

4
510 views