logo

राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात योग दिवस साजरा , नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शा

राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात योग दिवस साजरा ,

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे नवी मुंबई मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीलाच योग दिनाचे महत्त्व क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले त्यानंतर माननीय मुख्याध्यापक अमोल खरसांबळे यांनीही योगासनाचे फायदे व आपल्या जीवनामध्ये असणारे महत्व अनेक वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलं सर्व विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिक अतिशय मन मोकळेपणाने आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात केली पतंजलि ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योग यामधील आसन, प्राणायाम ,आसन करण्याचे प्रकार - खडे स्थिती -वृक्षासन, ताडासन ,बैठे स्थिती पद्मासन वज्रासन, पोटावर झोपून केले जाणारे आसने- भुजंगासन ,शलभासन, पाठीवर झोपून केली जाणारी आसने - सर्वांगासन ,हलासन यांची प्रात्यक्षिक दोन-दोन आवर्तनासह क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी केली व योगासनाचा अत्युच्च आनंद घेतला सोबतच सहकारी शिक्षक वृंद सुद्धा होता मुख्याध्यापक अमोल खरसंबळे शिक्षक रामराव कंदगुळे ,विनोद झापडे ,विजय चौरे ,कावेरी गोटीमुक्काल्ला, वैशाली धनावडे यांच्यासह शाळेतील इयत्ता नववी दहावी मराठी व हिंदी माध्यमाच्या जवळपास 300 विद्यार्थी व विद्यार्थिनी योगासनं करण्याचा मनमुराद आनंद घेतला व शाहू महाराज विद्यालयात योग दिन साजरा झाला.

0
18214 views