logo

सियाचीन ग्लेशियरमध्ये पाकिस्तानी कारवायांपासून सियाचीन  वाचवणारे भारतीय लष्कराचे खरे हिरो आणि प्रसिद्ध गिर्



सियाचीन ग्लेशियरमध्ये पाकिस्तानी कारवायांपासून सियाचीन  वाचवणारे भारतीय लष्कराचे खरे हिरो आणि प्रसिद्ध गिर्यारोहक कर्नल नरेंद्र कुमार राहिले नाहीत. बुल कुमार या नावाने प्रसिद्ध असलेले नरेंद्र कुमार यांचे दिल्लीतील लष्करी रुग्णालयात निधन झाले.
कर्नल कुमार यांची गणना देशातील सर्वोत्तम गिर्यारोहकांमध्ये होते. जगातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
पाकिस्तानातील रावळपिंडी येथे-१९३३ मध्ये जन्मलेले कर्नल नरेंद्र कुमार यांना कर्नल 'बुल' म्हणूनही ओळखले जात होते.कर्नल बुल-१९५३-मध्ये कुमाऊँ रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले होते.त्याचे इतर तीन भाऊ सैन्यात होते. विशेष बाब म्हणजे कर्नल बुल यांना-१९७७-मध्ये सियाचीन ग्लेशियर काबीज करण्याची पाकिस्तानची योजना लक्षात आली आणि त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
कर्नल नरेंद्र कुमार यांच्या अहवालावरून लष्कराने दि:-१३-एप्रिल-१९८४-रोजी ‘ऑपरेशन मेघदूत’ राबवून सियाचीन ताब्यात घेतले. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील ही पहिली कारवाई होती.त्यांच्या अहवालानंतरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन मेघदूत चालवण्यास मान्यता दिली होती
आज भारत सियाचीन ग्लेशियर्स वर ठामपणे उभा आहे त्या ग्लेशीयरमधील सर्वंच उंच शिखरांवर त्याचंच आधिपत्य आहे तेथील रस्त्यांची,मार्गांची भारताला खडानखडा माहिती आहे आणि भारतानं पाकिस्तानला सियाचीनपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.आणि या सर्वाचं श्रेय जातं ते केवळ आणि केवळ एकट्या कर्नल नरेंद्र कुमार शर्मा म्हणजेच नरेंद्र 'बुल'कुमार यांनाच.   
कर्नल बुल यांनी जगातील सर्व उंच शिखरांवर तिरंगा फडकवून देशाची मान उंचावली.नंदा देवी या शिखरावर चढाई करणाऱ्या पहिला  भारतीय होता .
कर्नल बुलच्या धाडसाचा अंदाज यावरून लावता येतो की त्याच्या सुरुवातीच्या मोहिमांमध्ये त्यानी चार बोटे गमावली होती.असे असूनही उत्साह कमी झाला नाही आणि त्याने माउंट एव्हरेस्ट,माउंट ब्लँक आणि कंचनजंगा या शिखरावरही तिरंगा फडकवला.१९६५-मध्ये भारताच्या पहिल्या एव्हरेस्ट विजेत्या संघाचे ते उपप्रमुख होते.
कर्नल बुल यांना अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले.यामध्ये परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि कीर्ती चक्र तसेच पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारांचा समावेश आहे.
देशाचा हा एक नायक अप्रसिद्धच राहून  आपल्यातून निघूनही गेला...

प्रत्येक देशवासियातर्फे आपल्याला आम्हा नागरिकांकडून शत शत नमन 
सॅल्यूट

11
14648 views
  
11 shares