logo

दी फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे आज उद्घाटन क

दी फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे आज उद्घाटन केले. यावेळी छायाचित्रकार रुपेश मालवाणी, शशांक नरसाळे, सुनील व्यास, राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.

 जहांगिर कला दालनात प्रदर्शन भरविण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. दी फोटोग्राफीक सोसायटीने या प्रदर्शनाच्या माध्यमांतून छायाचित्रकारांच्या कलेला व्यासपीठ मिळवून दिले. क्षणभर विश्वास बसणार नाही, अशी अचूक वेळ साधून छायाचित्र टिपण्यात आली आहेत, यातून कलावंतांची कलादृष्टी नजरेस पडते. महाराष्ट्र राज्य नेहमी कला क्षेत्रात आघाडीवर असते. ही कला जोपासण्यासाठी राज्य शासन कलाकारांना कायम प्रेरणा देत राहील.
यावेळी छायाचित्रकार संतोष निंबाळकर व अन्य छायाचित्रकार यांना ही  पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

57
16467 views
  
53 shares