logo

N.D.R.F व S.D.R.F सांगलीला स्वतंत्र युनिट द्यावे

*आज दिनांक 9/8/ 2021 सोमवार रोजी माननीय संपर्क प्रमुख बानुगडे पाटील साहेब जिल्हाप्रमुख आनंद बापू पवार,संजय बापू विभुते यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी सो यांना निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले सदरच्या निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की जुलै 2021 रोजी पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पूर आल्याने खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक हानी झाली होती त्यामुळे सांगली या ठिकाणी N.D.R.F व S.D.R.F (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल ) व ,(राज्य आपत्ती व्यवस्थापन दल ) याचे युनिट पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक मराठवाडा व कोकण यासाठी सांगलीला स्वतंत्र युनिट द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या प्रचंड महापुराने याचा मोठा फटका सांगली जिल्हाला बसला असल्याने तसेच या पुरात सांगली जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली होती तसेच सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर या जिल्ह्याचे व मराठवाडा,उत्तर कर्नाटक व कोकण यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून सांगली हे ठिकाण जवळ पडते त्या अनुषंगाने केंद्र सरकारने व राज्य सरकारने या ठिकाणी अनुक्रमे N.D.R.F व S.D.R.F चे युनिट तात्काळ मंजूर करावे सदरच्या युनिटमध्ये 1100 ते 1200 प्रशिक्षित जवानांची फौज असल्याने तसेच या युनिटमध्ये अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन याला मदत करण्यासाठी साधनसामुग्री असल्याने नागरिकांची तात्काळ जीवित हानी व आर्थिक हानी वाचणार आहे परिसरामध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास सदरच्या युनिटचा सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर,कोकण,मराठवाडा,व उत्तर कर्नाटक या परिसराला सांगली येथे N.D.R.F व S.D.R.F एन.डी.आर.एफ चे युनिट झाल्यास आपत्तीग्रस्त लोकांना सदरच्या युनिटच्या माध्यमातून तात्काळ मदत पोहोचून सर्वसामान्य नागरिकांचे जीवित हानी वित्तहानी वाचण्यास मदत होणार आहे त्यानुषंगाने तात्काळ केंद्र सरकारने व राज्य सरकारने सांगलीला स्वतंत्र N.D.R.F ,व S.D.R.F एन.डी.आर.एफ चे युनिट मंजूर करावे तसेच सन 2019 साली मध्यप्रदेश सरकारने S.D.R.F एस.डी.आर.एफ (राज्य आपत्ती व्यवस्थापन दल ) मध्यप्रदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 52 जिल्ह्यामध्ये S.D.R.F एस.डी.आर.एफ चे युनिट मंजूर करून प्रत्येक जिल्ह्यात 15 जवानांचे युनिटचे छोटी छोटी टीम करून कार्यान्वित केले आहे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये S.D.R.F एस.डी.आर.एफ (राज्य आपत्ती व्यवस्थापन दल) स्वतंत्र युनिट आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू करावे अशी मागणी सदरच्या निवेदनातून करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब यांनी शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन दिले की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करून मंजूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले* *यावेळी दिगंबर जाधव,सचिन कांबळे,रावसाहेब,घेवारे,प्रभाकर कुरळपकर,अनिल शेटे,लक्ष्‍मण वडर,बाळासाहेब मगदूम,जितेंद्र शहा,मानसी शहा,स्वप्नाली कुरळपकर,प्रकाश लवटे,सनत पाटील,संतोष पाटील,प्रसाद रिसवडे,सुशांत मधाळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते*

19
14675 views
  
23 shares