logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे* *राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण*



गेल्या पाच वर्षांत, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे. 'मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून, यामुळे पशुधनाची वेळेवर, सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे.
या उपक्रमाच्या यशानंतर, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी 'व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा' सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळवणे सोपे करणे, संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम (तात्काळ) पशुवैद्यकीय साहाय्य प्रदान करणे हा आहे.
*व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा*
शेतकरी +91 9063142299 या क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून किंवा निश्चित केलेला क्यूआर (QR) कोड स्कॅन करून या चॅटबॉट सेवेचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या घरातूनच, व्हॉट्सॲपच्या अत्यंत सोप्या व वापरण्यास सुलभ इंटरफेसचा वापर करून जलद व सोयीस्कर पशुवैद्यकीय सल्ला आणि सेवा मिळाव्यात, अशा पद्धतीने हा चॅटबॉट डिझाइन करण्यात आला आहे.
*हे कसे काम करते?*
शेतकरी +91 9063142299 या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर "Hi" पाठवून खालील सेवा मिळवू शकतात:
• पशुधनाचे आजार, उपचार आणि लसीकरणाबाबत माहिती मिळवणे.
• पशुसंवर्धन आणि सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळवणे.
• खालील माध्यमांद्वारे पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधणे:
o चॅट (Chat)
o ऑडिओ कन्सल्टेशन (व्हॉईस कॉल सल्ला)
o व्हिडिओ कन्सल्टेशन / टेलिकन्सल्टेशन (व्हिडिओ कॉल सल्ला)
*प्रमुख वैशिष्ट्ये*
• पशुवैद्यकीय टेलिकन्सल्टेशन (दूरस्थ सल्ला) सेवा
• ऑडिओ व व्हिडिओ कॉलद्वारे सल्ल्याची सोय
• पशुवैद्यकीय डॉक्टरांशी थेट संवाद
• रुग्णालय व पशुवैद्यकीय सेवा डिरेक्टरीची (मार्गदर्शिका) उपलब्धता
• सरकारी माहिती
• वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
*प्रागतिक माहिती (ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६)*
• ६१५ शेतकऱ्यांनी चॅटबॉटचा वापर करून संवाद साधला आहे.
• २०१ व्हिडिओ कन्सल्टेशन (व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला) यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.
*उपक्रमाची उद्दिष्टे*
• संपूर्ण महाराष्ट्रात पशुवैद्यकीय सेवा वितरणाची यंत्रणा बळकट करणे.
• शेतकऱ्यांना वेळेवर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
• डिजिटल सुलभता वाढवणे आणि सेवांचा विस्तार करणे.
• तात्काळ संवाद व जलद प्रतिसाद यंत्रणा सक्षम करणे.
*शेतकऱ्यांना होणारे फायदे*
• प्रवास न करता घरबसल्या पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता.
• पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद.
• सरकारी योजना व त्यांच्या फायद्यांविषयी जागरूकतेत वाढ.
• सेवा मिळवण्यासाठी लागणारा वेळ व खर्चात बचत.
• पशुधनाचे आरोग्य व उत्पादकतेत सुधारणा.
हा उपक्रम शेतकऱ्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व संपूर्ण राज्यात कार्यक्षम, सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित पशुवैद्यकीय आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी BFIL आणि पशुसंवर्धन विभाग परिश्रमपूर्वक कार्यरत आहे. पशुपालकांना तात्काळ पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, या उद्दिष्टाला पशुसंवर्धन विभागाने प्राथमिकता दिली असून, पशुपालक व शेतकरी बांधवांनी १९६२ या कॉलसेंटर सेवेचा अधिकाधीक लाभ घ्यावा.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.)
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य

पशुवैद्यकीय चॅटबॉट सेवेसाठी खालील क्युआर (QR) को ड स्कॅन करा:

4
534 views

Comment