logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

नांदेड, दि. 18 मे : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 अंतर्गत पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील मौजे नांदुसा येथील श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाने एकत्र येत इर्जिक पद्धतीने 200 लिटर दशपर्णी अर्क तयार केला.

यासाठी लागणाऱ्या दहा प्रकारच्या वनस्पतींचा पाला गोळा करून त्याचे कुटण व प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक महिला सदस्यांनी प्रत्यक्ष सहभागातून केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारीकोटे यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित महिलांना समजावून सांगितली.

पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विशाल इंगळे यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मृदा परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. खतांच्या मात्रा परीक्षण अहवालानुसार योग्य पद्धतीने देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर कैलास पेरके यांनी गटामार्फत पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच त्यासाठीच्या गुणांकन पद्धतीची माहिती दिली. उमेदचे मेंटॉर कंदुरके यांनी प्रास्ताविकातून BBF पेरणी व उताराला आडवी मशागत याबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमात गटातील सर्व महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. SOP पद्धतीचा अवलंब करून सहकार्याने गटशेती व स्मार्ट शेती करण्याचा निर्धार यावेळी सदस्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धेसाठी पूर्ण तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी गटाच्या निमंत्रक श्रीमती माया जनकवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबाराव जनकवाडे, मन्मथ जनकवाडे, शिवदास जनकवाडे, दैवशाला डांगे यांच्यासह गटातील सर्व सदस्यांनी सह

1
370 views

Comment