*50 कोटीच्या नेव्हीस गुंतवहूक घोटाळ्यात एमपीआयडी कोर्टात अब्राहम मथाई विरोधात तक्रार अर्ज....* *अब्राहम मथाईच्या अडचणी आणखी वाढल्या.......
मुंबई, सर्वात मोठ्या गाजलेल्या नेव्हीस गुंतवणूक घोटाळ्यात अब्राहम मथाई याना एमपीआयडी न्यायालयात सह आरोपी करण्यात यावे, अशा अनेक तक्रारी अर्ज न्यायालयात गेल्याने सध्या चर्चेत असलेले अब्राहम मथाई याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे कोर्ट काय निर्णय देते? याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. . नेव्हीस गुंतवणूक घोटाळा हा ख्रिश्चन धर्मियांशी निगडित असून यामध्ये अनेक गरजू गरीब यांनी स्वतःकडे आयुष्यभर कमावलेली पुंजी गुंतवणूक केली असून त्यानंतर हा घोटाळा घडल्याचे उघडकीस आल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. गरीब गुंतवणूकदारांना न्याय मिळावा म्हणून कोर्टामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामध्येच आता अब्राहम मथाई याचे नाव गोवले गेल्याने आता या घोटाळ्यामध्ये अनेक बाबी उघड होण्याची दाट शक्यता आहे, . या घोटाळ्यातील ऑक्टोविया नेव्हीस याने अनेक ख्रिश्चन बांधवांना धार्मिकतेशी जोडून त्यांना गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक केली होती, त्यानंतर गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी एमपीआयडी न्यायालयात धाव घेतली होती, किमान 50 कोटी रुपयांचा हा घोटाळा असून आता या घोटाळ्यामध्ये सह आरोपी करण्यासाठी सध्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात असणाऱ्या हार्मनी फाउंडेशनचे अब्राहम मथाई याचे तक्रारीत सहआरोपी करण्याची मागणी पिडीत गुंतवणूकदारांनी केल्याने न्यायालय आता काय निर्णय देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑक्टोविया नेव्हीस याचा मुलगा अबेदनिगो नेव्हीस त्याच्यासोबत अब्राहम मथाई हार्मनी फाउंडेशनमध्ये 50 कोटीची गुंतवणूक करून या घोटाळ्यात अडकला असून तशा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. या घोटाळ्यातील पैसा अब्राहम मथाई याच्या हार्मनी फाउंडेशन कडे वळवण्यात आल्याचे तक्रार अर्जात गंभीर नोंद केली गेली आहे. यामध्ये शेकडो गरीब ख्रिश्चन बांधवांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. अशी माहिती मिळते की अब्राहम मथाई याने अनेक पाद्री बांधकाम व्यवसाय आणि उद्योगपतींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसा उखळल्याचेही तक्रारीत म्हटले गेले आहे. एवढेच नव्हे तर अब्राहम मथाई याने त्याच्या मुलीचा प्रियकर जॉर्ज मेंडोंसा तसेच लेमन न्यूजचे खान आणि शेख यासारख्या विविध पत्रकारांचा वापर केला गेल्याचेही तक्रारीत म्हटले गेले आहे. त्यामुळे मथाई याच्या अडचणीत वाढ झाल्याने आता कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. अनेक तक्रारदार कोर्टाच्या निर्णयाची आतुरतेने न्यायाच्या अपेक्षेने वाट पाहत आहेत. राजेश कनोजा आणि राम कनोजा यांनी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये अब्राहिम मथाई यांच्या विरोधात तक्रार केल्याचेही सांगण्यात आले. मराठी अभिनेत्री अर्चना दामोहे यांनी वरसावा पोलीस स्टेशनमध्ये मथाई विरोधात तक्रार केल्याचीही नोंद झाली आहे....