logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आपले सरकार सेवा केंद्रासाठी नांदेडमध्ये पारदर्शक मुलाखती*

*आठ तालुक्यांच्या मुलाखती शुक्रवारी पडल्या पार, शनिवारी उर्वरित आठ तालुक्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार*

नांदेड दि. 15 मे :- नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३६२ आपले सरकार सेवा केंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात १५ मे रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आला. जिल्हा सेतू समितीच्या वतीने या केंद्रासाठी शुक्रवारी अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड आणि माहूर या आठ तालुक्यातील ५६९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

जिल्ह्यात ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्रासाठी जिल्हा सेतू समितीच्या वतीने अर्ज मागविण्यात आले होते या १३६३ केंद्रांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीनंतर मुलाखतीची प्रक्रिया १५ मे रोजी सुरू झाली आहे. मुलाखत प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत एकूण १२ स्वतंत्र मुलाखत कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी आठ तालुक्यासाठी स्वतंत्रपणे आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात आली होती.

या मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऊन व पावसापासून संरक्षण होईल अशा प्रकारच्या मोठ्या मंडपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ही मुलाखत प्रक्रिया पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने व्हावी यासाठी रँडम पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तालुक्यांचे बारा गट करून ते संबंधित मुलाखत कक्षांना वेळेवर वितरित करण्यात आले. त्यामुळे कोणत्या उमेदवाराची मुलाखत कोणत्या अधिकाऱ्याकडून घेतली जाणार आहे याची माहिती कुणालाच उपलब्ध नव्हती. ती माहिती मुलाखतीच्या दिवशीच अधिकाऱ्यांसह उमेदवारांनाही कळाली. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व निष्पक्षपणे पार पडली.

मुलाखतीसाठी तालुके वाटप झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी सर्व उमेदवारांना त्यांच्या मुलाखत कक्षाबाबत आणि नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांबाबत माहिती देऊन प्रभावी समन्वय साधला. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थी किंवा गैरप्रकारांना वाव न देता अतिशय पारदर्शक व गोपनीय पद्धतीची अंमलबजावणी केली. संपूर्ण दिवसातील मुलाखती अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध आणि कोणत्याही अडचणी शिवाय पार पडल्या.

या यशस्वी आणि पारदर्शक मुलाखती पार पडण्यामागे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रभावी मार्गदर्शन सुयोग्य नियोजन आणि प्रशासकीय दृष्टिकोनास असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली. अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड आणि माहूर या आठ तालुक्यातील ५६९ उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी १५ मे रोजी पार पडल्या. उर्वरित आठ तालुक्यांतिळ ६५१ उमेदवारांच्या मुलाखती उद्या १६ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दि

3
371 views

Comment