logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग*

*पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग*

*नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग*

नांदेड, दि. 11 मे : नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरण प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. सर्व संबंधित गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

नागरिकांनी कालवा, नाल्यातून बेकायदेशिर पाणी उपसा (पंपीग) करु नये व पाण्याची नासाडी टाळावी जेणेकरुन सर्व गावांना पाणी मिळणे सोयीस्कर होईल. पाणी टंचाई निवारणासाठी जलसंपदा विभाग कटिबध्द असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे केले जाईल, अशी माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

30 मार्च 2026 च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यासाठी 3.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 4.00 दलघमी व 1 मे 2026 च्या आदेशान्वये 5.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.

*विसर्ग व लाभक्षेत्र*
इसापूर धरणातून थेट पाणी सोडण्यास्तव विमोचक नसल्याकारणाने कालवा प्रणालीमधून नियमित कालवा आवर्तनाचे वेळापत्रकाप्रमाणे संयुक्तीक होईल अशा विमोचकाद्वारे 5 एप्रिल 2026 रोजी पासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 11 मे 2026 अखेरपर्यत एकूण मागणी 12.00 दलघमी पैकी 6.81 दलघमी इतके पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आले आहे.

*तालुकानिहाय गावे*
नांदेड जिल्हा-
गुरफळी, बाभळी, बनचिंचोली, वाटेगाव, हरडफ, धोत्रा, कामारी, पिंपरी, डोल्हारी, सिरपल्ली, सिल्लोड, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ, साप्ती, मनुला (बु), म्हाटाळा, पेवा दिघी, घारापुर, पळसपूर, डोल्हारी व विरसणी या गावांचा समावेश आहे.

*यवतमाळ जिल्हा-*
टाकळी, राजापूरवाडी, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी,दिघडी, ऊंचवडद, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, भोजनगर, बिटरगाव, रतननाईकनगर, बोडका, पिंपळगाव, पेंदा, लिंगी, मुरली, मुळावा, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर व सिंदगी या गावांचा समावेश आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी दिली.

12
1071 views

Comment