logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे**आवेदन पत्र भरण्याचे आवाहन*

नांदेड दि. 5 एप्रिल :- इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच (फेब्रु-मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ठ न झालेले ) जून-जुलै 2026 नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.
शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा, नियमित शुल्क मंगळवार 5 मे ते शुक्रवार 15 मे 2026 पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 16 मे ते बुधवार 20 मे 2026 असा आहे.
उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत आरटीजीएस व एनईएफटीद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा, गुरुवार 21 मे 2026, उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस व एनईएफटी पावती, चलनासह प्रीलीस्ट विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख सोमवार 25 मे 2026 अशी आहे.
या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांची त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु-मार्च 2026 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जून- जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 व जून-जुलै 2027 अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ शाळा महाविद्यालयांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट द्वारे प्राप्त ऑनलाइ्रन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसीआय बॅकेच्या र्व्हचुअल खात्यामध्ये कोणत्याही बँकेमधून आरटीजीएस व एनईएफटीद्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सीस बँक च्या जून्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोचा स्वरुपात शुल्क स्विकारले जाणार नाही. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलबध करुन दिली जाणार नाहीत. नियमित व विलंब शुल्काने आवेदनपत्रे ऑनलाइ्रन पध्दतीने सादर करावयाच्य तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अति विलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळव

1
88 views

Comment