*कर्षण मशीन कारखाना अतिरिक्त मंडल, नाशिकरोड मध्य रेल्वे यांच्या वतीने, डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती गीत गायनाने उत्साहात संपन्न!*....
*कर्षण मशीन कारखाना अतिरिक्त मंडल, नाशिकरोड मध्य रेल्वे यांच्या वतीने, डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती गीत गायनाने उत्साहात संपन्न!*
विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ व्या जयंती समारोह २०२६ कर्षण मशीन कारखाना अतिरिक्त मंडल नाशिकरोड मध्य रेल्वे यांच्या वतीने आयोजित भीम जयंती उत्साहात साजरी झाली .
एस सी /एसटी अतिरिक्त मंडल नाशिकरोड.जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
अखंड भारतातील सुरील्या आवाजाची लोकप्रिय महागायिका नामांकित बॉलिवूड पार्श्वगायिका, कविता राम संच मुंबई यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी,वेळ:-सायंकाळी सात वाजता ठिकाण:-नारायण बापू नगर चौक. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ,जेलरोड. नाशिकरोड. येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे माननीय बी. के. खोईया साहेब, झोनल अध्यक्ष एससी एसटी असोसिएशन मुंबई झोन या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक अध्यक्ष आयुष्यमान:- मिलिंद पी
देहाडे. सेक्रेटरी /मा.झोनल उपाध्यक्ष एससी एसटी असोसिएशन उद्घाटक आयुष्यमान माननीय जसविंदर पाल, मुख्य कारखाना प्रबंधक. कार्यक्रमाच्या अध्यक्षा.आयुष्यमती सुचित्राताई (दिवे ) गांगुर्डे, एससी एसटी असोसिएशन कर्षण मशिन कारखाना नाशिकरोड. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अमोल कुचेकर.झोनल सेक्रेटरी असोसिएशन मुंबई झोन. सुधीर जंजाळे झोनल कार्याध्यक्ष mumm एसएससी असोसिएशन मुंबई झोन. आयुष्यमान मिथिलेश कुमार मुख्य कारखाना प्रबंधक. कारखाना प्रबंधक डी सी भिऊगडे.सि आर एम एस चे प्रमोद महाशबदे प्रशांत महाजन.पैठणकर साहेब Nrmu चे अजय किरकाडे शरद बोडके निलेश राऊत, रेल कामगार सेनेचे भारत पाटील.सुभाष सोनावणे apo नरेश कुमार शिंदे. Tmw चे माजी वर्क्स मॅनेजर संजय पगारे या कार्यक्रमासाठी ऑल इंडिया एससी एसटी एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त मंडल कर्षण मशीन कारखाना , नाशिक रोड प्रणित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे ट्रॅक्शन नाशिक रोड. जयंती अध्यक्ष आयु. हेमंत गवई . जयंती कार्याध्यक्ष संतोष जाधव. उपाध्यक्ष आयु. दशरथ जाखीरे. सचिव शिरसाठ आयु.अर्जुन इवने. उपसचिव प्रल्हाद सोनवणे.खजिनदार आयु.सुरेंद्र निळे. उपखजिनदार आयु. अरुण बोर्डे.सुभाष पगारे वैभव अहिरे अनिल चोपडे निलेश रोकडे, दीपक धिवर सतीश सोये तसेच सर्व पदाधिकारी. महिला प्रतिनिधी.युवा प्रतिनिधी सदस्य आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.डी एच पगारे साहेब .संजय बाबुराव काळे. नाशिक रोड परिसरातील सर्व नगरसेवक.प्रशांतभाऊ दिवे, प्रमिला मैंद, शैलेश ढगे यांच्यासह नाशिकरोड जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाशभाऊ भालेराव. व मान्यवर तसेच संजय(नाना) भालेराव. भारत निकम हरीश भाऊ भंडागे, अमोल पगारे पदाधिकारी तसेच हेमंत कुमार गवई .अर्जून ईवने.वाल्मीक जी. देहाडे .भुसावळ मंडळ अध्यक्ष. पप्पू तायडे .प्रेम बिराडे .मुंबई मंडल जे पी आर्याजी, रील फेम आसावरी बर्वे .प्रेम बिऱ्हाडे भारतीय बोद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक पी के गांगुर्डे, राजु गांगुर्डे, महिला मंडळाच्या सदस्या भीमकन्या लता देहाडे, गौतमी शिरसाठ, पूजाताई गोसावी, रंभाताई भालेराव, ज्योती शिरसाठ, सुशीला जोपूळकर,सद्धम्म टूर्स संचालक अभिजीत श्यामराव भोसले, प्रताप गांगुर्डे ,प्रकाश पगारे, चिमणकर, अरुण शेजवळ, शशिकांत पगारे गौतम बर्वे ,समीर साळवे ,अविनाश कटारे ,आकाश निकम, मुकुंद तायडे ,कैलास अहिरे ,विस्वास साबळे ,सचिन रोकडे, संध्या भदाणे ,भूमी जाधव,सारिका जाधव,जयश्री बोडके, लीलाबाई पगारे ,हरीश सुनील बर्वे समीर साळवे, अविनाश कटारे ,हरीश जाधव,
कवी रत्नदीप जाधव,अनिल जगताप, दशरथ जाखीरे, स्टेज व साऊंड रोहन भालेराव ,आयु. आयुष मिलिंद देहाडे,यांचा संच आदी मान्यवर उपस्थितीत होते. याप्रसंगी मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भीमगीतांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रम अतिशय उत्साहात तालासुरात महिलांच्या नृत्यात संपन्न झाला. लहान बालकांनी विविध प्रकारचे गीत गायन नृत्य आविष्कारांच्या गुणदर्शनाने रसिकांची दाद मिळवली.सांस्कृतिक कार्यक्रमात भीम गीतांसोबत विविध प्रकारच्या नाट्यकृती साकारण्यात आल्या.
ह्या सोहळ्यात जेलरोड परिसरातील महिला पुरूष नागरिकांसह बालक वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाँलिवूडची पार्श्वगायिका कविता राम यांनी आपल्या मंजूळ आवाजात विविध गीते गाऊन, नाशिकच्या कार्यक्रमास चार चाँद लावले!