logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Seaplane : भारतात धावपट्टी नव्हे पाण्यावरूनच उडणार अन् लँड होणार फ्लाईट ! कुठं होणार तरंगती विमानतळं.....?

भारतात विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली. ही वाढ होण्यामागची कारणं अनेक आहेत. मात्र, विमान प्रवाससुद्धा आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचला असून, त्या धर्तीवर भारताच्या हवाई क्षेत्रामध्ये एक मोठा बदल होणार आहे. कारण, आता विमानं फक्त धावपट्टीवर लँड आणि टेक ऑफ होणार नसून, थेट पाण्यावरही विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ होईल. यासाठी स्कायहॉप एविएशन या संस्थेला डीसीजीएनं (DGCA) यासाठीचं एअर ऑपरेटींग सर्टिफिकेट जारी केलं असून, आता या कंपनीचा भारतातील मार्ग मोकळा झाला आहे. ही कंपनी सरकारच्या निकषांची पूर्तता करत असून, आता व्यावसायिक उड्डाणांसाठी सज्ज झाली आहे.

अतिशय महत्त्वाच्या मान्यतेनंतर आता ही कंपनी भारतात पहिली समर्पित सीप्लेन सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. हा टप्पा एक अतिशय महत्वाचं यश असून, भारतात वॉटर एयरोड्रोम आधारित हवाई प्रवासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे. या टप्प्यानंतर लक्षद्वीपमध्ये त्यासाठीचा नवा टप्पा सुरू होईल. ज्यानंतर पाच बेटं या सेवेमुळं जोडली जातील. शिवायम मेनलँडशीसुद्धा हा हवाई मार्ग जोडला जाईल जिथं 19 जणांची आसनक्षमता असणारं विमान उड्डाण भरेल.

भारतातील विमान प्रवास क्षेत्रासाठी का महत्त्वाचा आहे हा निर्णय?

भारत हा एक असा देश आहे जिथं अनेक तलाव, समुद्रकिनारे, बेटं आहेत. जिथं धावपट्टी बनवणं कठीण असून, तिथं सीप्लेन हा एक उत्तम पर्याय ठरेल. यामुळं पर्यटनाला चालना मिळेल. लहान बेटं एकमेकांशी जोडली जातील, वेळेची बचत होईल, रस्ते प्रवासात ताटकळण्याचा मनस्ताप कमी होईल.

SkyHop Aviation कंपनीचा मुख्य हेतू काय?

स्कायहॉप एवलिएशन ही भारतातील पहिली समर्पित कमर्शिअल सीप्लेन सेवा असेल, जिथं पाण्यावरून विमान आकाशात झेपावण्याची सुविधा सुरू होईल. येत्या काळात भारतात अंदमान निकोबार, गोवा, केरळ, गुजरातचा किनारपट्टी भाग, उत्तर पूर्वेकडील मोठे तलाव, मोठे जलाशय आणि अगदी महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रांमध्येसुद्धा सुरक्षितता आणि उपलब्धता पाहून सीप्लेनच्या सेवेचा विचार केला जाऊ शकतो.

किती सुरक्षित असेल हा विमान प्रवास?

सीप्लेन ऑपरेशन सक्तीच्या उड्डाण नियमांअंतर्गत चालतं. त्यात या कंपनीला DGCA कडून एओसी प्रमाणपत्र मिळाल्यामुळं सुरक्षितता, प्रशिक्षण आणि संचलनाच्या निकषांची पूर्तता झाल्याची बाब अधोरेखित होत आहे.

46
1602 views

Comment