सोमवारी धर्माबाद येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड, दि. 22 एप्रिल:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि. कंपनीमार्फत तरूणांसाठी टोयोटाचा शिका आणि कमवा या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण विनामुल्य दिले जाणार आहे. नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, धर्माबाद येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि. यांच्यामार्फत युवकांना तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन या कोर्सेस असून पात्रता वय 18 ते 21 वर्षे व शिक्षण 10 वी, 12 वी पास असणे आवश्यक आहे. या उपक्रमातर्गत विद्यावेतन प्रथम वर्ष 15 हजार 815 रूपये प्रति महिना, व्दितीय वर्ष 17 हजार 615 रूपये प्रति महिना तसेच मूलभूत सुविधासह राहण्याची व जेवणाची व्यवस्था आणि सुरक्षितता व देखरेखसाठी 24 तास वार्डन असणार आहे. सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार असून जपना-इंडिया इंन्सिटटयुट फॉर मॅन्युफॅक्चरींग व नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट चे प्रमाणपत्र मिळणार आहे.
तरी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि. यांच्यामार्फत मुलाखती घेण्यात येणार असून जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी दिनांक सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, धर्माबाद येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांनी केले आहे.
आधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड यांच्याशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाचा ई-मेलnandedrojgar01@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर संपर्क करावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.