logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*नाशिक गांधीनगर मुद्रणालय कॉलनीत जयंतीनिमित्त कवीसंमेलनासह विविध कार्यक्रम संपन्न*


सिद्धार्थ मित्र मंडळ प्रणित सेवास्तंभ प्रेस कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन तर्फे सम्राट अशोक चक्रवर्ती, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गांधीनगर मुद्रणालयात व कॉलनीत दिनांक १२,१३ व १४ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम मुद्रणालयात कामगारांसाठी मिठाईचे वाटप केले.
कारंजा चौकात ज्येष्ठ कवी गीतकार रंगराज डेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कविसंमेलनात अनेक निमंत्रित कवी कवयित्रींनी विविध आशयांच्या उत्कृष्ट कविता व गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवून कवी संमेलनाला चार चाँद लावले.
त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मान्यवर कार्यकर्ते - सतीश गोविंद साळवे,कवी अशोक भालेराव,आयु.अनिता शरद कांबळे,कमलबाई अर्जुन लोखंडे, रवींद्र गो. महाले,वनरक्षक माधवी जाधव/शिंदे तसेच प्रभागातील नवनिर्वाचित मान्यवर नगरसेवक श्री. राहुल दिवे, सौ.ज्योती अनिल जोंधळे,सौ.आशा रफिक तडवी व ॲड.पूजा प्रवीण नवले आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल,पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस व्यवस्थापक बंशीधर दुबे,
पी.एस.आय श्रीकांत पवार तसेच श्री भामरे,केंद्रीय इंजि. प्रणय रामटेके,
म.फुले महामंडळाचे व्यवस्थापक श्री संतोष शिंदे, युनियन जनरल सेक्रेटरी प्रमोद पवार,अध्यक्ष कुंदन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, क्रेडिट को.सोसायटी चे चेअरमन श्री.सुधीर जोशी व मंडळाचे अध्यक्ष शिवपाल पंचभाई इ. उपस्थित होते.
याप्रसंगी माधवी जाधव व अनिता जाधव /कांबळे यांनी सत्कारार्थी हया नात्याने आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे नगरसेवक राहुल दिवे यांनी बाबासाहेबांचे तत्कालीन परिस्थितीतील जनहित कार्ये व आजची परिस्थितीवर विस्तृत विचार मांडले तर दुबे व पवार यांनी मंडळा च्या विविध कृतिशील उपक्रमांचे कौतुक केले.
१४ एप्रिल रोजी मराठी गौरव गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
राजेश जाधव व विश्वास गवळी , माधुरी जाधवसह अनेक गायकांनी महापुरुषांची गौरव गीते सादर केली.
दरम्यान गांधीनगर प्रेसमध्ये निवडून आलेले युनियनचे सर्वश्री प्रमोद पवार,गणेश रोकडे,देवेंद्र पगारे,कुंदन गायकवाड,रमेश
मक्वाना यांचा प्र. पाहुण्यांच्या हस्ते पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कॉलनीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळा
चे पदाधिकारी चेतन दाणी, प्रशांत आव्हाड,शेखर साळुंखे, देवेंद्र जाधव,
अनिल गायकवाड,संदीप गायकवाड दीपक घोलप,दिलीप बोराडे, जितेंद्र गवारे,सुनील उणवणे,देवेंद्र पगारे, सुनील पवार,शरद गायकवाड, दीपक साळवे, शिवपाल पंचभाई सह अनेकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अशोक भालेराव यांनी केले तर आभार सागर सोनवणे यांनी मानले!

9
756 views

Comment