Kalyan Accident:
कल्याणजवळ भीषण
अपघात ! 'काळी-
पिवळी'मधील 11 जागीच ठार.......
कल्याणजवळ एक अत्यंत भीषण अपघात झाला असून मोठी जीवितहानी झाली आहे. कल्याण मुरबाडदरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पांजरा पुलावर झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या इको गाडीला सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली. इको गाडीमध्ये बसलेल्या 12 पैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी 11 वाजून 15 मिनिटींनी घडला.
सगळे जागीच ठार
इको गाडीमधून मुरबाडमधील काही रहिवाशी कल्याणच्या दिशेला जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये काळी-पिवळी चालवणाऱ्या चालकासहीत गाडीतील सर्वांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
अपघाताचं कारण काय?
टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तपास सुरू. स्थानिकांनी मदत केली, मृतदेह बाहेर काढले. पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, आता सुरळीत करण्यात आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. अपघाताचे नेमके कारण समोर आलेलं नाही. ओव्हरस्पीड, ओव्हरलोड किंवा इतर कोणते कारण या अपघातासाठी कारणीभूत आहे याचा तपासात सुरु आहे.
अपघातांचा महामार्ग...
26 जानेवारी रोजी जुन्नरमधील आणे येथे पिकअप आणि बोलरोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. 12 फेब्रुवारी रोजी ओतूरमध्ये शाळेच्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 15 विद्यार्थी जखमी झाले. मार्च 2025 मध्ये ओतूरजवळील उदापूर येथे एकाच दिवशी तीन अपघात झाले होते. या अपघांमध्ये 2 जण ठार झाले तर अनेकजण जखमी झालेले. जानेवारी ते जुलै या 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण आहिल्यानंतर कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर 31 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 20 जणांनी प्राण गमावला असून 30 जण जखमी झाले आहेत.
इथं एवढे अपघात का होतात?
एवढ्या मोठ्या प्रमाणात या मार्गावर अपघात होण्यासाठी चार ते पाच महत्त्वाची कारण आहेत. ज्यात प्रमुख्याने या मार्गावरुन जाणारे भाजीपाल्याचे पिकअप, ट्रक, बस हे आहे. तसेच या मार्गावरील रस्ता काही भागामध्ये अरुंद आणि अत्यंत वळणार आहे. काही ठिकाणी नदीवर पूल बांधले जात असल्याने रखत रखडत वाहतूक होत असते. वेग आणि नियमांचा भंग करुन अनेकजण वाहनं चालवतात. अनेक वहानं ओव्हरस्पीडींग करतात. या ठिकाणी तासाला 80 किमी प्रती तास वेगमर्यादा आहे. ओव्हरलोडींग आणि बेकायदेशीरपणे या मार्गावरुन अनेक चालक गाड्या चालवतात. पावसाळ्याच्या दिवसात येथील रस्ता फारच धोकादायक ठरतो कारण या ठिकाणी पथदिवे नाहीत. महामार्ग चौपदरीकरण पुलाच्या कामामुळे अनेक ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आलं आहे.