logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नायगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व महाअभियान संपन्न

धाराशिव ( विकास वाघ ) महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर” कळंब तालुक्यातील नायगांव येथे नुकतेच दि १० शुक्रवार रोजी संपन्न झाले. या शिबिरात शासनाच्या महसूल,भूमी अभिलेख,ग्रामविकास,कृषी, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन,महावितरण,एस.टी. महामंडळ, आरोग्य,शिक्षणसह व ईतर विविध १९ विभागातील सेवा पुरविण्यात आल्या.या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी,महिला,विद्यार्थ्यांच्या महसुली विभागाशी संबंधित विविध समस्या व तक्रारीवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे महसूलसह ,भूमी अभिलेख,ग्रामविकास,कृषी, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन,महावितरण,एस.टी. महामंडळ, आरोग्य,शिक्षणसह व ईतर विविध १९ विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात ५२८ लोकांनी प्रत्यक्ष लाभ तर १३८ लोकांचे विविध विषयासंबंधीचे अर्ज स्वीकृती असे एकूण ६६६ नागरीकांनी शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
कार्यक्रमासाठी कळंब उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार कळंब हेमंत ढोकले,अप्पर तहसीलदार श्रीमती.प्राजक्ता पाटील,नायगांवच्या सरपंच वनमाला राजाभाऊ पाटील,उपसरपंच अशोक माळी,माजी संचालक भरतराव शितोळे पाटील, नायब तहसीलदार , पंडित जाधव व गोकुळ भराडिया, रांजणी पंचायत समिती सदस्य रांजणी योगेश्वरीताई गणेशराव पवार,नायगांव मंडळ अधिकारी वर्षा ढेकरे ,महसूल मंडळ नायगांव अंतर्गत सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच नायगांव मंडळातील नायगांव ग्राम महसूल अधिकारी संजय माळी,रांजणी ग्राम महसूल अधिकारी रवींद्र नवले,पाडोळी ग्राम महसूल अधिकारी किशोर गायकवाड,जायफळ ग्राम महसूल अधिकारी उमेश जाधवर,घारगाव ग्राम महसूल अधिकारी ओंकार झोरी, ढोराळा ग्राम महसूल अधिकारी पल्लवी जामदार , विविध गावचे पोलीस पाटील,मंडळातील सर्व बी एल ओ ,शरद शितोळे, महादेव शितोळे,रवी गोरे तसेच महसूल सेवक बालाजी राऊत, पांडुरंग आल्टे व रामेश्वर मुंडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्याण पांचाळ यांनी केले.

3
156 views

Comment