कवठे महांकाळचे ज्येष्ठ नागरिक मारुती जाधव यांचे निधन ,
सांगली - कवठे महांकाळ येथील सेवानिवृत्त मलेरिया वर्कर मारुती विठोबा जाधव (वय ८६) यांचे बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कवठे महांकाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मारुती जाधव हे अत्यंत शांत, मितभाषी आणि सर्वांशी आदराने वागणारे ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात मलेरिया विभागात प्रामाणिकपणे काम करत समाजाची सेवा केली होती.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे, पुतणे, जावई असा मोठा परिवार आहे. कवठे महांकाळच्या एकमेव महिला माजी सरपंच सौ. बबुताई वाघमारे तसेच प्रा. सुरेश जाधव यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनामुळे जाधव व वाघमारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
मारुती जाधव यांच्या जाण्याने एक आदर्श, सन्माननीय आणि सज्जन व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.