मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित*
*अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*
नांदेड, दि. ५ मार्च :- नांदेड जिल्ह्यातील एकूण ५९ नागरिक दुबई, शारजाह, कतार, बहरीन व सौदी अरेबिया या मध्यपूर्व देशांमध्ये असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती आज दि. ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.
दरम्यान, मध्यपूर्व देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांचे अचूक स्थान व इतर आवश्यक माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून ‘नवीन सहाय्यता गल्फ’ ही लिंक जारी करण्यात आली आहे.
तरी नांदेड जिल्ह्यातील जे नागरिक मध्यपूर्व देशांमध्ये अडकून पडले आहेत त्यांनी संबंधित लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी. तसेच यापूर्वी जुन्या गुगल शीटमध्ये माहिती भरलेल्या ५९ नागरिकांनीही नव्याने या लिंकवर माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनीही ही लिंक संबंधित व्यक्तींना पाठवून त्यांना माहिती भरण्यास सांगावे, जेणेकरून अडकलेल्या नागरिकांचे अचूक स्थान शासनाला समजू शकेल व आवश्यक मदत पोहोचविणे सुलभ होईल.
तरी याबाबतीत काही शंका असल्यास जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/