मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान*
नांदेड,दि. 14 फेब्रुवारी:- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन प्रसंगी आमदार राजेश पवार, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावरून हेलिकॉप्टरने परळी वैजनाथ जि. बीडकडे महापशुधन एक्स्पो 2026 या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.