logo

मुंबईसह आणखी एका पालिकेत लोकांनी राजकारण्यांना नाकारलं, 'इतक्या' टक्के लोकांची NOTA ला पसंती....!

Nashik Palika NOTA:  राजकीय पक्षांच्या नेते निवडणुकीनंतर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांशी सौदेबाजी करतात, ज्याला 'घोडेबाजार' म्हणतात. पालिका निवडणुकीत असे अनेक प्रकार झाल्याचे आरोप नेत्यांनी एकमेकांवर केले. या सर्वाचा परिणाम नागरिकांनी मतदानातून दाखवून दिला. मतदान करताना लोकांनी नोटा देऊन आपला विरोध दर्शवला. राजकारण हे केवळ पैसा आणि पदांसाठीचा खेळ झाला.सौदेबाजी लोकांच्या मतांचा अपमान होतो आणि निवडलेले प्रतिनिधी जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या फायद्याकडे लक्ष देतात, असा आरोप नागरिकांनी केलाय. मुंबईतील महापालिका निवडणुकीत एकूण 54 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. त्यातील सुमारे 1 लाख 327 जणांनी 'नोटा' म्हणजेच नन ऑफ द अबव्ह हा पर्याय दाबला. हे एकूण मतदानाच्या 1.83 टक्के इतके आहे. मुंबईच नव्हे तर आणखी एक अशी पालिका आहे जिथे लोकांनी नोटाला मोठ्या प्रमाणात पसंती दिलीय. कुठे आणि का घडलंय असं? सविस्तर जाणून घेऊया. 

लोकशाहीचा खेळ

महायुती आणि महाविकास आघाडी सारख्या मोठ्या युतींमुळे राजकारणात अनेकदा अनपेक्षित युत्या-आघाड्या होतात. जे सर्वसामान्य लोकांना लोकशाहीचा उपहास वाटतो. नाशिक महापालिकेतील मतदारांच्या मनातही अशीच भावना असावी. युती, आघाडी केवळ सत्ता मिळवण्यासाठी असतात, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नव्हे, असे मत नागरिकांनी नोंदवलंय. पक्षांना आपली चूक कळावी यासाठी लोकांनी नाराज होऊन नोटाचा पर्याय निवडलाय. आम्ही आता अधिक जागरूक आहोत आणि राजकीय खेळखंडोबा सहन करणार नाहीत, असा संदेश मतदार राजाने दिलाय.  

मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष

सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन समस्या जसे पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य यांकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. निवडलेले सदस्य केवळ राजकीय खटल्यात व्यस्त असतात, जनतेच्या गरजा विसरतात. आपण निवडलेले नेते जबाबदारी टाळतात, असे मतदारांना वाटते. परिणामी लोकांनी महापालिका निवडणुकीत नोटा देऊन आपला रोष व्यक्त केला.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या 12 टक्के मतदारांनी 'नोटा'  पर्याय निवडला. सामान्य जनता राजकीय नेत्यांच्या वर्तनावर खूप नाराज असल्याचे नोटा पर्यायातून दिसून येते. यामुळे मतदारांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास कमी होत आहे आणि मतदार अधिक सावध झाले आहेत. हे नोटा मतदान हे एक प्रकारे मूक आंदोलन आहे, जे राजकीय पक्षांना सुधारण्याचा इशारा देते, असे मतदार सांगतात. 

राजकीय पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज 

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत लोकांनी आपला असंतोष स्पष्टपणे जाहीर केला.जनता राजकीय पक्षांच्या वागणुकीवर आणि प्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर खूप चिडल्याचे 12 टक्के मतदानातून दिसतंय.  'कोणताही पक्ष योग्य नाही तर आम्ही कोणालाही मत देणार नाही.', असे मतदार म्हणतात. यामुळे आता राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करावे लागेल आणि जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या लागतील. अन्यथा, भविष्यात अशा नाराजीची किंमत त्यांना मोजावी लागू शकते. 

मुंबईत'नोटा'चा मोठा वापर

मुंबईतील महापालिका निवडणुकीत एकूण 54 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. त्यातील सुमारे 1 लाख 327 जणांनी 'नोटा' म्हणजेच नन ऑफ द अबव्ह हा पर्याय दाबला. हे एकूण मतदानाच्या 1.83 टक्के इतके आहे. याचा अर्थ असा की हे मतदार कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार नव्हते. ज्यामुळे मतदारांची नाराजी स्पष्ट झाली. मतदार आता अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यांना पर्याय न आवडल्यास ते नकारात्मक मत व्यक्त करतात. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 52.94 इतकी होती. तरीही 'नोटा'चा हा आकडा लक्षवेधी आहे.

97
4106 views