logo

सेवा स्टॉलच्या माध्यमातून सेवेची सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले



“हिंद दी चादर” शहीदी समागमानिमित्त सेवाभावी संस्था व नागरिकांना आवाहन

नांदेड, दि. २० जानेवारी:- नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी “हिंद दी चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील विविध ठिकाणी सेवा स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या सेवा स्टॉल्सवर भाविकांसाठी चहा, पाणी, नाश्ता, फलाहार आदी सुविधा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या सेवाकार्यासाठी विविध सेवाभावी संस्था, व्यापारी व व्यावसायिक आस्थापना, उद्योजक, शासकीय कार्यालये, बँकिंग क्षेत्र तसेच सेवा देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक भाविकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी आणखी जास्तीत जास्त संस्था व नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

सेवा हीच खरी श्रद्धांजली असून, सेवा स्टॉलच्या माध्यमातून समाजसेवेची संधी सर्वांनी साधावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

सेवा स्टॉल्सच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे तहसीलदार महसूल यांचेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.

4
242 views