logo

बेंबळी येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला मोठे खिंडार ! खा ओम राजेनिंबाळकर व आ कैलास पाटीलांना धक्का !

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी - विकास वाघ
मो,९६५७६७०७६५
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. युवासेनेचे शहरप्रमुख अनिल दाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह, तसेच धाडस ग्रुपचे अध्यक्ष अभय डोणे, युवानेते रोहित निकम आणि राजसिंह गावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
या घडामोडीमुळे बेंबळी परिसरात खा ओम राजेनिंबाळकर आणि आ कैलास पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

हा प्रवेश कार्यक्रम धाराशिव जिल्ह्याचे नेते व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
या राजकीय घडामोडींमुळे बेंबळी परिसरातील संघटनात्मक समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख कार्यकर्ते :

कैलास लोकरे, नितीन होळकर, अमोल माने, अतुल तानवडे, विजय तूपसुंदरे, अण्णासाहेब मोरे, सुदर्शन कांबळे, अंकुश डावखरे, दीपक दाणे, दीपक सोनटक्के, चेतन डावखरे, ओंकार डावखरे, आर्यन राऊत, श्रीकांत माळी, अभिषेक हिंडोळे, आकाश वाघे, संदेश मोटे, हर्षल मोटे, अमर मोटे, कमलाकर गावडे, रोहित पटाडे, ओंकार ढबाले, सागर शिंदे, कुणाल मनाळे, सागर कुंभार, विलास डावखरे, श्रीराम वाळके, श्रीराम दाणे, शुभम दाणे, सुनील दाणे, दादासाहेब दाणे, उमेश सोनटक्के, शंकर दूधभाते, किशोर माने, अविनाश सोनटक्के आदी.

या प्रवेशावेळी उपस्थित मान्यवर : नितीन काळे, मधुकर तावडे, उद्धव पाटील, धनंजय पाटील, खंडेराव चौरे, बालाजी गावडे, नाना कदम, राजाभाऊ सोनटक्के, प्रशांत रणदिवे, मोहन खापरे, हाश्मुद्दीन शेरीकर, प्रकाश शेळके, युवराज नळे, प्रसाद इंगळे, सोमनाथ गवळी, पांडुरंग पवार, पद्माकर निकम, गोविंद शिडुळे, विद्या माने, नवनाथ कांबळे, हनुमंत खापरे, राजाभाऊ रसाळ, नेहरू भोरे, संताजी व्हनसनाळे युवा नेते अजित खापरे आदी उपस्थित होते.

11
1359 views