logo

*प्रलंबित ई-चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी* *लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन*



नांदेड, दि. 21 नोव्हेंबर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन, ई-चलन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 13 डिसेंबर 2025 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या लोक अदालतमध्ये वाहन चालक/मालक यांनी हजर राहावे. तसेच तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा व सर्वानी उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0
114 views