logo

पोलिस तक्रार का घेत नाहीत ?

हाळदा ग्रामसभेत सरपंचाची दादागिरी – मराठा तरुणावर भरसभेत हल्ला, पोलिसांनी तक्रार नाकारली

हाळदा (ता. कंधार, जि. नांदेड) :
हाळदा गावातील ग्रामसभा लोकशाही मार्गाने चालावी अशी अपेक्षा असताना, ती सरपंचाच्या दादागिरीने अक्षरशः गंडांतरात गेली. सरपंचाच्या इशाऱ्यावर समाजातील काही कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील एका तरुणावर भरसभेतच हल्ला चढवून मारहाण केली. लोकशाहीचा अपमान करणारी ही घटना ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत उघडपणे घडली.

सर्वसामान्य नागरिकांवर उघडपणे हात उचलला जात असताना पोलिस मात्र घटनास्थळी हजरच झाले नाहीत. एवढ्यावर न थांबता, पीडित तरुणाने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, ती तक्रार स्वीकारण्यासही सरळ नकार देण्यात आला.

या कारभारामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. “सरपंचाच्या दादागिरीला पोलिसांचे छत्रछाया आहे काय? न्याय मागणाऱ्याला आवाज दाबून बसवायचे, तर मग लोकशाही उरली कुठे?” असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

गावातील नागरिकांनी या घटनेचा निषेध करत संबंधित सरपंच व समर्थकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा कठोर आंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिनिधीः सचीन हळदेकर, कंधार

14
844 views