
सातवीच्या मुलीचा मृतदेह तब्बल 20 दिवसांनी सापडला; निष्पाप जीवाचे तुकडे तुकडे करून पाण्यात फेकलं .......
गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता असलेली सातवीतील मुलीचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे. पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट भागातील या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एका पोत्यात आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे त्या मृतदेहाचे काही भागाचे तुकडे करुन पाण्यात फेकण्यात आले होते. या प्रकरणात मुलीच्या पालकांनी शाळेतील शिक्षकावर अपहरण केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांनी शिक्षक मनोज कुमार पालला अटक केली असून याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने एका पोलीस अधिकाऱ्याचा हवाला देत वृत्त दिलं आहे की, हा नराधम शिक्षक मुलीवर अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत होता, अशी तक्रार मुलीने पालकांना केली होती. (body of a seventh grade girl was found after 20 days the innocent life was cut into pieces and thrown into the water)
शिक्षक शाळेत मुलीसोबत...
पीटीआय वृत्तानुसार पोलिसांने सांगितलं की, मुलीने तिच्या आईला सांगितलं होतं की, शिक्षकाने तिला शालेत अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केला होता. त्यामुळे जेव्हा ती बेपत्ता झाली तेव्हा पालकांनी पोलिसांना या प्रकरणात तक्रार दाखल केली असताना या शिक्षकाच्या कृत्याबद्दल सांगितलं आणि त्यांनी त्याच्यावर मुलीच्या अपहरणाचा आरोप केला. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यानंतर त्या मुलीचा मृतदेह त्यांना 20 दिवसांनी सापडला.
दरम्यान पीडितेच्या कुटुंबाचे वकील अभिषेक बॅनर्जी यांनी आरोपी शिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. वकील म्हणाले की, पालकांना संशय आहे की, मुलीच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनेक दिवस बलात्कार करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपासणी करुन नराधम शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. तरदुसरीकडे या प्रकरणात आदिवासी समुदायातील सदस्य आक्रमक झाले. त्यांनी बुधवारी रामपूरहाट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निदर्शन केली. त्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोपही केला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, शिक्षकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर सखोल चौकशीदरम्यान शिक्षकाने गुन्हा कबूल केला आहे. अपहरण, खून आणि नंतर मृतदेह फेकल्याची कबुली नराधम शिक्षकाने पोलिसांकडे दिली आहे. या कबुलीनंतर पोलिसांनी शिक्षकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर विद्यार्थ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गेला आहे.
त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, सातवीत शिकणारी ही मुलगी 28 ऑगस्टला ट्युशन क्लासला जाण्यासाठी घरातून गेली होती. पण ट्युशन क्लास झाल्यानंतर बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबाने बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना शिक्षक मनोज कुमार पाल यांच्या कृत्याबद्दल आणि त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला. तपास सुरु असताना पोलिसांना तब्बल 20 दिवसांनी विद्यार्थ्याचा विद्रूप मृतदेह एका निर्जल स्थळी आढळला. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी अजून शिक्षकावर बलात्काराचा कोणताही गुन्हा नोंदवला नाही. पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. तसंच शिक्षकाने विद्यार्थिनीची हत्या का केली आणि हत्येपूर्वी त्याने तिच्यावर अत्याचार केला होता का, याबद्दल पोलीस तपास करत आहेत. दरम्यान शिक्षकाला नऊ दिवसांची पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
1. बिरभूम हत्याकांड नेमके काय आहे?
पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट भागातील दिना का पुरवा गावात राहणाऱ्या सातवीतील १३ वर्षीय आदिवासी मुलीचा मृतदेह २० दिवसांनंतर १७ सप्टेंबर २०२५ रोजी सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एका पोत्यात होता आणि काही भाग तुकडे करून पाण्यात फेकले गेले होते. कुटुंबाने शाळेतील शिक्षक मनोज कुमार पालवर अपहरण आणि हत्येचा आरोप केला आहे.
2. मुलगी कधी बेपत्ता झाली आणि कसे सापडली?
मुलगी २८ ऑगस्ट २०२५ रोजी ट्युशनसाठी घरी निघाली आणि परत आली नाही. कुटुंबाने बेपत्ता तक्रार दाखल केली. १७ सप्टेंबर २०२५ रोजी रामपूरहाटजवळील कालिदंगा गावाजवळील निर्जन जंगलात मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेला आणि तुकडे करून पाण्यात फेकलेला होता.
3. शिक्षक मनोज कुमार पालवर काय आरोप आहेत?
शाळेतील भौतिकशास्त्र शिक्षक मनोज कुमार पालवर अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप आहे. मुलीने आईला सांगितले होते की, शिक्षकाने शाळेत अनेक वेळा तिचा अयोग्य स्पर्श केला होता. कुटुंबाने तक्रारीत हे सांगितले, आणि पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे.