logo

'मी पुन्हा येईन'चा मेसेज अन् तरुणीवर बलात्कार; पुण्यातील हादरवून सोडणारा प्रकार.....

पुणे शहरातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून 'मी पुन्हा येईन' असा संदेश ठेवून तीव्र मानसिक धक्का दिला आहे.

ही घटना पुण्यातील कोंढवा येथील एका गार्डेड सोसायटीमध्ये घडली आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून कोंढव्यातील गार्डेड सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सोसायटीमध्ये जाताच त्याने दरवाज्यावर पीडित महिलेला 'कुरिअर बॉय असल्याचे सांगितले. पण तिथे असणाऱ्या तरुणीने त्याने दिलेले कुरिअर हे तिचे नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, कुरिअर बॉयने हे कुरिअर तुमचे असून तुम्हाला यावर सही करावी लागेल असा त्या तरुणीसमोर आग्रह धरला.

पीडितेच्या मोबाईलमध्ये आरोपीचा सेल्फी अन् 'मी पुन्हा येईन'चा मजकूर

नकार देऊन देखील कुरिअर बॉयने आग्रह केल्यामुळे अखेर त्या महिलेला सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर यावे लागले. ज्यावेळी ती तरुणी बाहेर आली त्याच क्षणी त्या आरोपीने त्या तरुणीच्या तोंडावर केमिकल असणारा स्प्रे फवारला. ज्यामुळे ती जागीच बेशुद्ध झाली. यानंतर कुरिअर बॉयने तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर आरोपीने अत्यंत निर्ढावलेपणाने पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला. तसेच 'मी पुन्हा येईन' असा मजकूर टाईप करून ठेवला. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पीडित महिला 22 वर्षीय आहे. कोंढवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला घरात एकटी असताना डिलिव्हरी बॉय आला माझ्याकडे पेन नाहीये पेन द्या असं सांगितलं. त्यानंतर आरोपीने घरात प्रवेश करून अत्याचार केलाय. घटना स्थळाचा पंचनामा केला असून पीडित महिलेचा मोबाईल तपासाला आहे. त्यामध्ये एक फोटो मिळाला असून त्यामध्ये आरोपीने लिहिलं आहे मी पुन्हा येईल. आरोपीने बेशुद्ध करण्यासाठी कोणता स्प्रे वापरला याचा तपास सुरु आहे. घरी पीडित महिला आणि त्यांचा भाऊ राहतात. भाऊ कामानिमित्त गावी गेला होता.

आरोपी पीडित महिलेच्या ओळखीचा होता का?

याबाबत तपास सुरु आहे. लवकर आरोपीला अटक करू. सीसीटीव्ही हस्तगत केले आहेत. सध्या पीडित महिलेची प्रकृती ठीक आहे. मागील एक वर्षांपासून ती पुण्यात राहते. आरोपीने रेकी केलीय याबाबत अधिकचा तपास चालू आहे. आरोपीचे वय अंदाजे 25 असण्याची शक्यता आहे. आरोपीच्या शोधासाठी दहा पथके रवाना करण्यात आले आहेत.

80
5203 views