आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पर्यायांचा उपयोग करावा
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पर्यायांचा उपयोग करावानिवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळनांदेड, दि. ५ नोव्हेंबर: निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान प्रक्रिया अधिक सक्षम,प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी विविध चार पर्याय निवडणूक आयोगाने दिले असून, त्याचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी केले आहे. त्या चार पर्यायांची माहिती पुढील प्रमाणे आहे.*आचारसंहिता नियंत्रण कक्ष* हा कक्ष तहसील कार्यालय, नांदेड येथे पहिल्या मजल्यावर स्थित असून पंचायत समितीच्या सभागृहात चोवीस तास या कक्षाचे कार्य अविरतपणे चालू आहे. आचारसंहितेचे काही उल्लंघन आढळल्यास अथवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी या कक्षात प्रत्यक्ष येवून आपली तक्रार नोंदवू शकतात. प्रत्यक्ष येणे अशक्य असल्यास modelcodeofconductofficer@gmail.com या मेल आयडीवर सुध्दा आँनलाईन आपली तक्रार नोंदवू शकतात. *सिव्हिजील सिटिझन अँप* सदरील अँप प्ले-स्टोरवरुन डाऊनलोड करुन यावर आपली आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार नोंदवू शकतात. अत्यंत जलदगतीने व तत्काळ तक्रारीचे निराकरण केले जाते. *एस.एस.टी.स्थिर पथक* सदरील पथक नांदेड दक्षिण मतदारसंघात तीन ठिकाणी चोवीस तास नेमून दिलेल्या स्थळी चौकसपणे कार्यरत आहे. *डेरला पाटी, नांदेड लोहा रोड,बोंढार तर्फे हवेली-नांदेड-मुदखेड रोड,काकांडी-नांदेड-नायगाव रोड* अशा तीन स्थानी हे पथक कार्यरत आहे. दक्षिण नांदेड मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची हे पथक अत्यंत बारकाईने तपासणी करतात. प्रमाणापेक्षा जास्त रोकड,मौल्यवान वस्तू आणि आचारसंहिता कायद्याने प्रतिबंधित बाबींची काटेकोरपणे तपासणी केल्या जात आहे. आक्षेपार्ह बाबी जप्त केल्या जातात. *एफ.एस.टी.फिरते पथक* सदरील पथक चोवीस तास नांदेड दक्षिण मतदार क्षेत्रात फिरत असून यावेळी आचारसंहिता भंग होत असलेल्या बाबींवर कटाक्षाने लक्ष ठेवते. अशा बाबी आढळल्यास त्यावर तात्काळ आचारसंहिता कायद्यानुसार कार्यवाही केली जाते. निवडणूका निरपेक्षपणे व आचारसंहितेचा भंग न होवू देता पार पाडण्याची मोलाची जबाबदारी या चार मार्गाने केली जात आहे. सर्वांनी या चार मार्गांचा योग्य उपयोग करुन आचारसंहिता भंग न होवू देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहननिवडणूक अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी केले.०००००