logo

आठ जणांचा मृत्यू ४० प्रवाशांना वाचवण्यात यश............. चंदीगड : पंजाबमधील मुक्तसरमधील कोटकपुरा रोडवरील झबेलवली गाव

आठ जणांचा मृत्यू
४० प्रवाशांना वाचवण्यात यश.............

चंदीगड : पंजाबमधील मुक्तसरमधील कोटकपुरा रोडवरील झबेलवली गावाजवळ एका खासगी कंपनीची बस सरहिंद कालव्यात पडली. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ४० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताच्या वेळी बसमध्ये ६०-६५ प्रवासी होते. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. बस मुक्तसरहून कोटकापुराच्या दिशेने जात होती. अपघाताच्या वेळी बसचा वेग जास्त होता, असे सांगण्यात येत आहे. कालव्याच्या काठावर लावलेली लोखंडी ग्रील तोडून बस कालव्यात पडली.
एसएसपी हरमनबीर सिंग गिल आणि विविध पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. विभागीय आमदार जगदीपसिंग काका ब्रार हेही घटनास्थळी पोहोचले आहेत.

245
8328 views
  
1 shares